हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; 3 मार्च रोजी मुंबईत होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन
राज्यातील महायुती सरकारच्या नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाची शनिवारी सांगता झाली. फक्त 6 दिवस चालेल्या अधिवेशनाचे सूप वाजले आहे. मात्र, या अधिवेशनापर्यंत खातेवाटप झाले नसल्याने अधिवेशन बिनखात्याच्या मंत्र्यासह झाले. या अधिवेशनात बीड, परभणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह शेतकरी व विविध समस्यांवर विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले.
या अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकूण 17 विधेयके मंजूर झाली असून 2 विधेयके प्रलंबित आहेत. संयुक्त समितीकडे एक आणि विधान सभेत एक विधेयक प्रलंबित आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 78 सदस्य नवीन निवडून आले आहेत, तर 5 जण विधानपरिषदेवरून विधानसभेत आले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 6 बैठका झाल्या, 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले असून सभागृहाची 10 मिनिटे वाया गेली आहेत. एकूण 7 तास 44 मिनिटे दररोज सरासरी काम झाल्याची माहितीही विधानसभा अध्यक्षांनी दिली. दरम्यान, पुढील अधिवेशन 3 मार्च रोजी मुंबईत होईल, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List