राजकारणात फक्त ‘यूज अँड थ्रो’ होते, त्यामुळे त्याबाबत माझं मत चांगलं नाही; नितीन गडकरींची परखड भूमिका

राजकारणात फक्त ‘यूज अँड थ्रो’ होते, त्यामुळे त्याबाबत माझं मत चांगलं नाही; नितीन गडकरींची परखड भूमिका

स्पष्टवक्तेपणासाठी आणि परखड मते बेधडक मांडण्यासाठी नितीन गडकरी ओळखले जातात. आता त्यांनी राजकारणाबाबत परखडपणे आपले मत मांडले आहे. राजकारणाबद्दल माझं मत काही चांगलं नाही, इथे फक्त ‘यूज अँड थ्रो’ केले जाते, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. त्यांनी हे मत पुण्यातीलएका कार्यक्रमात व्यक्त केले.

पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक आहे. आणीबाणीसह अनेक आंदोलनात होतो. मात्र 50 रुपये जवळ नसल्याने आपल्याला तुरुंगवास झाला. त्यावेळी पैसे द्यायलाही कोणी तयार नव्हते. त्यामुळे एक शिकलो की पैसा आयुष्यातील साध्य नाही पण साधन आहे. सोसायट्यांची काम घेणं आता सर्वपक्षीय धंदा झाला आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यात पण हेच सुरु आहे. तुमच्याजवळ पैसे नसतील तर राजकारणाला तुमची गरज नसते. त्यामुळे प्रत्येकाने आधी घर सांभाळले पाहिजे आणि मग देश आणि त्यानंतर राजकारणाकडे बघावे. कारण राजकारणाबद्दल माझं मत काही चांगल नाही, इथे फक्त ‘यूज अँड थ्रो’ होते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

आदर्शच्या कल्पनेवर 100 टक्के उतरवणारे राज्य कोणी निर्माण केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मुलगा आहे म्हणून निर्णय त्याच्या बाजूने दिला नाही. अनेक लढाया जिंकल्या, पण स्त्रीवर अन्याय, अत्याचार करणारी एकही घटना त्यांच्या आयुष्यात नाही. शिवाजी महाराजांएवढा कोणी सेक्युलर झाला नाही. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही तर सर्वधर्म समभाव आहे. माझ्या कार्यालयात एकच फोटो लावला आहे, आणि तो म्हणजे शिवाजी महाराज यांचा तो फोटो आहे. जे आईवडील मुलांवर चांगले संस्कार करतात ती मूले यशस्वी होतात, असेही नितीन गडकरी म्हणाले.

अनेक समाजांनी मिळून आपला देश तयार झाला आहे. समाजातील शेवटचा घटक आहे तो परिवार. परिवारातील महत्वाचा घटक आहे तो परिवार. त्यामुळे समाज आणि देशाचा विकास व्हायचा असेल तर आधी परिवारांचा विकास झाला पाहिजे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं
या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…