धाराशिव जिल्ह्यातील वाघाला जेरबंद करून त्याच्या अधिवासात सोडावे; कैलास पाटील यांची मागणी
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील वाघाच्या संचाराच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. धाराशिव जिल्ह्याजवळ 400 ते 500 किलोमीटर परिसरात वाघाचा अधिवास नाही, त्यामुळे हा वाघ नेमका कोठून आला, असा सवाल उपस्थित होत आहे. वाघाच्या संचारामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळी शेतऱ्यांना शेतीकडे जातानाही जीव मुठीत घेत जावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने वाघाला जेरबंद करावे आणि त्याला अधिवासात सोडावे, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे.
दोन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात बिबट्याचा व वाघाचा वावर आहे. परवा वनविभागाच्या कॅमेरामध्ये बिबट्या आढळला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या आजूबाजूला कुठेही वाघाचा अधिवास नाही, त्यामुळे हा वाघ कुठून आला? रात्रीच्या वेळी वीज नसल्याने शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतात जात आहेत, त्यामुळे… pic.twitter.com/6IvlAYqg47
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 21, 2024
दोन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात बिबट्याचा व वाघाचा वावर आहे. परवा वनविभागाच्या कॅमेरामध्ये बिबट्या आढळला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या आजूबाजूला कुठेही वाघाचा अधिवास नाही, त्यामुळे हा वाघ कुठून आला? रात्रीच्या वेळी वीज नसल्याने शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतात जात आहेत, त्यामुळे वाघाला जेरबंद करून ज्या ठिकाणी अधिवास आहे अश्या ठिकाणी सोडावा. नागरिकांना आणि शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे तो दूर करावा, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List