Nanded News – पाटबंधारे नगर बॉम्बस्फोट प्रकरण, 12 आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Nanded News – पाटबंधारे नगर बॉम्बस्फोट प्रकरण, 12 आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

नांदेड शहरात 2006 साली पाटबंधारे नगरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची नांदेड न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात 49 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सदर स्फोट हा बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. यामुळे हा बॉम्बस्फोट नसल्याचा निर्वाळा देत न्या. सी. व्ही. मराठे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

काय आहे प्रकरण?

नांदेड शहरात 6 एप्रिल 2006 रोजी पाटबंधारे नगरात राजकोंडवार यांच्या घरी स्फोट झाला होता. सुरुवातीला हा स्फोट फटाक्याचा असल्याचे मानले जात होते. मात्र तत्कालीन पोलिसांनी याचा सखोल तपास केला. सर्व बाजूने सूक्ष्म तपासणी केल्यानंतर पोलिसांनी याबाबत वेगवेगळी माहिती हस्तगत केली. यात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे या दोघांचा मृत्यू झाला होता. तर मारोती वाघ, योगेश देशपांडे, गुरुराज टोपटीवार आणि राहुल पांडे हे गंभीर जखमी झाले होते.

तपासादरम्यान पूर्णा, परभणी, जालना येथेही झालेल्या बॉम्बस्फोटाशी याचा काही संबंध आहे का? याचाही तपास पोलीस करीत होते. यानंतर हे प्रकरण नांदेड पोलिसांनी सीबीआयकडे सोपवले. सीबीआयने याबाबत सखोल तपास करून दोन हजार पानांची चार्जशिट न्यायालयाल दाखल केली.

जिल्हा सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती सी. व्ही. मराठे यांच्याकडे हे प्रकरण होते. या खटल्यात 49 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र त्यात सीबीआय पाटबंधारे नगर भागातील स्फोट हा बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. अन्य कोण्या बाबीमुळे तेथे स्फोट झाला असावा हे ग्राह्य धरुन न्यायालयाने राहुल पांडे, संजय चौधरी, रामदास मुलंगे, मारोती वाघ, योगेश रविंद्र देशपांडे, गुरुराज तुप्तेवार, मिलिंद एकताटे, मंगेश पांडे, राहुल धावडे आणि जखमीवर उपचाराची माहिती न दिल्याने डॉ.उमेश देशपांडे या सर्वांना आरोपी करण्यात आले होते.

सदरच्या खटल्यात बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड.नितीन रुणवाल यांनी बाजू मांडली होती. सदरच्या बॉम्बस्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जातीय तणाव देखील निर्माण झाला होता. त्याठिकाणी बॉम्ब निर्माण करण्यात येत होते काय, असे तर्कवितर्क देखील वर्तविण्यात येत होते. तब्बल अठरा वर्षानंतर या खटल्याचा निकाल आज लागला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं
या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…