भिवंडीत धीरेंद्र शास्त्रींच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभूती घेण्यासाठी भक्तांची गर्दी
बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमावेळी भक्तांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना भिवंडीत घडली. चेंगराचेंगरी कुणाला दुखापत झाल्याची माहिती नाही. मात्र काही महिलांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे कळते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
माणकोली ब्लॉकजवळील इंडियन ऑईल कंपनीत धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भक्तांची गर्दी जमली होती. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी भक्तांना विभूती देणार असल्याचे सांगितले. यासाठी आधी महिला पुढे आल्या, मग पुरूष आले. मात्र हळूहळू गर्दी वाढू लागल्याने चेंगराचेंगरी झाली.
काही वेळातच गर्दी इतकी वाढली की नियंत्रणाबाहेर गेली. भक्तांमध्ये प्रथम विभूती घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. यावेळी भक्त एकमेकांच्या अंगावर चढू लागले आणि चेंगराचेंगरी झाली.
गर्दी वाढल्याचे पाहून धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून उठले. यानंतर लोकं स्टेटवर चढू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. बहुतांश स्त्रियांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना एका बाजूला बसवण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List