Hit & Run : भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रदीप असे मयत पोलिसाचे नाव आहे. दिल्लीतील पहाडगंज परिसरात ही घटना घडली. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक पहाडगंड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहे.
मयत पोलीस गाझियाबादमध्ये ट्रॅफिक पोलिसात उपनिरीक्षक पदी कार्यरत होते. त्रिलोकपुरी परिसरात राहणारे प्रदीप हे बाईकवरून जात असताना पहाडगंज परिसरात भरधाव कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. यात प्रदीप यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List