कल्याणमध्ये पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला, एकाचा मृत्यू, 2 ते 3 जण जखमी
मोठी बातमी समोर आली आहे, कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याणच्या म्हारळ येथील एमआयडीसी परिसरात पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. बबलू कलोजा असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचं नाव आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार या ठिकाणी काम सुरू होतं, याचदरम्यान हा अपघात झाला आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार कल्याणच्या म्हारळ MIDC परिसरात सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीच्या ब्रिजचे बांधकाम सुरू असताना अचानक ब्रिज कोसळल्याने बबलू कलोजा (वय 34) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत अन्य दोन ते तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित दुर्घटनेची चौकशी सुरू असून, काम सुरू असताना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कार्यस्थळावरील सुरक्षेबाबत प्रशासनाकडून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
असा झाला अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार कल्याणच्या म्हारळ MIDC परिसरात सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या ब्रिजचे बांधकाम सुरू होते, याचदरम्यान ही दुर्घटना घडली. पूल कोसळला, या अपघातामध्ये एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बबलू कलोजा (वय 34) असं या मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचं नाव आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातू हळहळ व्यक्त होत आहे.
दोन तीन जण जखमी
दरम्यान या अपघातामध्ये दोन ते तीन मजूर जखमी झाल्याचं देखील वृत्त आहे. जखमी मजुरांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List