दक्षिण कोरियामध्ये विमान अपघात नेमका कसा झाला? जाणून घ्या सविस्तर
दक्षिण कोरियामध्ये रविवारी सकाळी मोठा विमान अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या वाढली असून आता ती 179 झाली आहे. क्रू मेंबर्सह 181 प्रवासी विमानामध्ये प्रवास करत होते. विमान मुआन विमानतळावर लॅण्डिग करताना धावपट्टीवरुन घसरले आणि भिंतीवर जाऊन आदळले. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात विमानाच्या संपर्कात पक्षी आल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. विमान अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान भिंतीला आदळताना आणि आग लागल्याचे दिसत आहे. विमानाला आग लागण्यापूर्वी ते धावपट्टीवरून घसरताना दिसले. लॅण्डिग गियर निकामी झाल्यावर पायलट बेली लॅण्डिगचा प्रयत्न करताना दिसले. विमानतळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका निवेदनात सांगण्यात आले की, विमान लॅण्डिग यशस्वीरित्या होत नसल्याचे लक्षात आल्यावर पायलटने क्रॅश लॅण्डिग करण्याचा प्रयत्न केला. विमानाला पक्ष्यांच्या थव्याने धडक दिल्याने त्याचे लॅण्डिग गिअर खराब झाले. लॅण्डिग गिअर निकामी झाल्यानंतर पायलटने थेट विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. इमर्जन्सी लॅण्डिगदरम्यान विमानाचा वेग कमी करता आला नाही आणि विमान धावपट्टीवरुन घसरुन धावपट्टीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाउंड्री वॉलला धडकले. विमान धडकताच त्याचा मोठा स्फोट आणि आग पसरली. अपघातावेळी विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. प्रवाशांपैकी 173 दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत, तर इतर 2 थायलंडचे होते. सुदैवाने यातील दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यावर आता माजी वैमानिकांसह सोशल मीडिया नेटकऱ्यांनीही या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने लिहिले की, 3 किमीपेक्षा कमी लांबीच्या रनवेवर लॅण्डिग करताना विमानाचा वेग जास्त असणे हे देखील यामागे कारण असू शकते. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, जर हे नियोजित बेली लॅण्डिग होते तर धावपट्टीजवळ अग्निशमन दलाचे जवान का तैनात केले गेले नाहीत असा प्रश्न काहींनी विचारला आहे. अन्य एका युजरने विचारले की, विमानाच्या व्हिडीओनरुन असे दिसून येते की बेली लॅण्डिगचा प्रयत्न करण्यापूर्वी विमानाने एक चक्कर मारली नव्हती. असे विविध प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले.
मुआन अग्निशमन केंद्राचे प्रमुख ली जेओंग-ह्यून यांनी याबाबत सांगितले की, अपघाताचे कारण प्रतिकूल हवामानासह पक्षांची धडक बसणे आहे. मात्र, चौकशी केल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List