नात्याला काळीमा; आजोबा, वडील आणि काकांनीच केले अत्याचार, अल्पवयीन पीडिता गर्भवती
उत्तरप्रदेशात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.आजोबा, वडील आणि काकाने मिळून एका अल्पवयीन मुलीचे लैंगीक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपिंना अटक केली आहे. ती अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभर तिच्यावर लैगींक अत्याचार केला जात होता. शनिवारी पीडित मुलीने आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत मावशीचे घर गाठले. तिच्या घरी पोहोचून तिने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या मावशीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीत म्हंटले आहे की, पिडीतेचे वडिल तिला आणि तिच्या आईला ,सतत मारहाण करायचे. सततच्या मारहाणीला कंटाळून दोघी मायलेकी दिल्लीला आईच्या माहेरी निघून गेल्या. काही दिवसातच वडिलांनी मुलीला परत घरी आणले होते. त्यानंतर आजोबा, वडिल आणि काक तिच्यावर वर्षभर लैंगीक अत्याचार करत होते. यात ती दोन महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस अधिक्षक आलोक मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”मुलीच्या मावशीच्या तक्रारीनंतर आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले होते. त्यात ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. लवकरच तिन्ही आरोपींची डीएनए चाचणी होणार असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List