केबल रेल्वे ब्रिजवर जानेवारीपासून धावणार टेन
जम्मू-कश्मीरच्या रियासी जिह्यात हिंदुस्थानमधील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल (अंजी खड्ड ब्रिज) वर टॉवर वेगनची यशस्वी चाचणी पार पडली आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात जानेवारीत कश्मीरसाठी रेल्वे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये कनेक्टिविटीला प्रोत्साहन देण्यासाठी यूएसबीआरएल योजनेंतर्गत हिंदुस्थानमधील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. या रेल्वे पुलाचे बांधकाम मागील महिन्यात पूर्ण झाले होते. उधमपूर-श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) योजनेचा उद्देश कश्मीर खोऱ्यात रेल्वे जाळे तयार करणे आहे. या पुलाची उंची नदीपासून 331 मीटर उंच आहे. हा पूल चिनाब नदीवर बनवण्यात आलेल्या आर्च ब्रिजनंतरचा सर्वात उंच दुसरा पूल आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List