एक चोरी करायचा, दुसरा CCTV समोर उभा रहायचा; जुळ्या भावांचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले

एक चोरी करायचा, दुसरा CCTV समोर उभा रहायचा; जुळ्या भावांचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले

चोरी करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब चोरांच्या माध्यमातून केला जातो. अशा अनेक घटना तुम्ही वाचल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र मध्य प्रदेशमध्ये पोलिसांना हैरान करून सोडणार एक चोरीचे प्रकरण उजेडात आले आहे. जुळ्या भावांनी अनोखी शक्कल लढवत अनेकांना गंडा घातला आहे. या चोरांचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मौगंज पोलिसांच्या माध्यमातून चोरीच्या एका प्रकरणाचा उलगडा सुरू होता. त्या अनुषंगाने तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या चोरांमधील एका चोराने पोलिसांना हैरान करून सोडले. 23 डिसेंबरला रात्री मौगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत या चोरांनी सत्यभान सोनी यांच्या बंद घरामध्ये डल्ला मारला होता. यांनी घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर आरोपी रविशंकर विश्वकर्मा, जगन्नाथ केवट आणि सौरभ वर्मा यांनी पोलिसांनी अटक केले होते.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता. याच दरम्यान सौरभ वर्माचा जुळा भाऊ संजीव वर्मा पोलीस स्थानकात भावाची बाजू मांडण्यासाठी आला. त्याला पाहताच पोलिसही हैरान झाले. तपास केला असता ते दोघे जुळे भाऊ असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता दोघे भाऊ मिळून चोरी करत असल्याचे उघड झाले. एक भाऊ चोरी करायचा, याचवेळी दुसरा CCTV कॅमेऱ्याच्या समोर उभा रहायचा. दोघेही एक सारखे कपडे घालून चोरी करत असे. जेणेकरून चोरी केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणे शक्य होईल. तसेच जेव्हा जेव्हा पोलिस सौरभ वर्माला पकडायचे, तेव्हा तेव्हा सौरभ पुरावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रिकॉर्डिंग दाखवून आपली सुटका करून घेत होता. परंतु त्यांचे बिंग आता फुटले असून पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या कडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात वाल्मीकला आश्रय देणाऱ्यांची चौकशी करा, शिवसेनेची पोलिसांकडे मागणी पुण्यात वाल्मीकला आश्रय देणाऱ्यांची चौकशी करा, शिवसेनेची पोलिसांकडे मागणी
बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी साथ दिली, कोणी मदत...
पोलीस डायरी – महाराष्ट्र कलंकित होत आहे! महिलांवरील अत्याचार वाढले
माफ करा, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची दिलगिरी
अदानी म्हणतात, तर बायको पळून जाईल! आठवड्याला 70 तास काम करण्यावरून उद्योग जगतात मतमतांतरे
अलविदा 2024… वेलकम 2025! नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांनी उधळले उत्साहाचे रंग; हॉटेल, रेस्टॉरंटपासून सोसायट्यांच्या गच्चीपर्यंत ‘फुल टू सेलिब्रेशन’
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार सामूहिक जलसमाधी आंदोलन, बस्स झाली ड्रामेबाजी? मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक
21 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; निधी चौधरी, सोनिया सेठी यांना पदोन्नती