अंडरवेअरच्या कंपनीवरून पोलिसांनी लावला मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध, आठ महिन्यांनी हत्येचे गूढ उकलले

अंडरवेअरच्या कंपनीवरून पोलिसांनी लावला मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध, आठ महिन्यांनी हत्येचे गूढ उकलले

आठ महिन्यांपूर्वी जयंती नाल्यात मनपा सफाई कर्मचाऱ्यांना डोके नसलेला मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचे गूढ उकलण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आव्हानात्मक खुनाचा उलगडा करताना, अंडरवेअरच्या कंपनीवरून नातेवाईकांचा शोध घेत अशोक पाटील (रा. पिशवी, ता. शाहूवाडी) अशी खून झालेल्या व्यक्तीची माहिती मिळविली

दरम्यान, पोलिसांनी तपास करताना आठ महिन्यांपूर्वी अशोक पाटील याची हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी रंकाळा तलाव चौपाटीवर पाठलाग करून अजय उर्फ रावण दगडू शिंदे (वय 25, रा. डवरी वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) यानेच हा खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी अभिषेक मंजुनाथ माळी (वय २०), अतुल सुभाष शिंदे (वय २३, दोघे रा. डवरी वसाहत, कोल्हापूर) आणि अजय उर्फ रावण दगडू शिंदे (मयत) व इतर 4 अल्पवयीन मुलांवर राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 4 एप्रिलला जयंती नाल्यातील गाळ काढताना मनपा कर्मचाऱ्यांना डोके नसलेला पुरुष जातीचा मृतदेह आढळला होता. डोके आणि अंगावर कपडे नसल्याने पोलिसांना मृतदेहाची ओळख पटत नव्हती. शवविच्छेदन अहवालात शार्प कट असा डॉक्टरांचा अभिप्राय आल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपास करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार तपास करताना पथकाने जिल्ह्यातील सर्व मिसिंग व्यक्तींची माहिती घेऊन धडाच्या अंगावरील फक्त अंडरवेअरच्या कंपनीवरून नातेवाईकांचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आणले. पण, खून कोणी केला याबाबत काहीच माहिती नव्हती. तरीही तपास सुरूच होता. यावेळी डवरी वसाहतमधील रावण उर्फ अजय शिंदे, त्याचे दोन मेव्हणे आणि साथीदारांनी हुतात्मा पार्कमध्ये एकाचा खून करून त्याचे मुंडके कापून घड नाल्यामध्ये टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा उलगडा करत संशयितांना ताब्यात घेतले.

सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रवीण पाटील, संतोष बरगे, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, सुशील पाटील, कृष्णात पिंगळे व नामदेव यादव यांनी ही कारवाई केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Big Boss 18 – सलमान खानच्या शो चे पॅकअप होणार, ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले Big Boss 18 – सलमान खानच्या शो चे पॅकअप होणार, ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले
सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ यावर्षी टीआरपी मिळवण्यास असमर्थ ठरला. यामुळे या शो ला मुदतवाढ मिळत नाहीये. परिणामी...
Year Ender : 2024 मध्ये ‘या’ बाईक्सची विक्री झाली बंद, पाहा लिस्ट
250 किमीची रेंज, 45 मिनिटांत चार्ज होते फुल चार्ज; नवीन वर्षात लॉन्च होणार देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार
Photo – पाटण्याला चितपट करून प्रो कबड्डीत हरयाणाने मारली बाजी
Honda Activa की TVS Jupiter कोणत्या स्कूटरचे मायलेज जास्त ? पाहा
मोठी बातमी! सुरेश धस नरमले, प्राजक्ता माळींची मागितली माफी, नेमकं काय म्हणाले?
घाटकोपर दुर्घटनेत १७ जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीस सात महिन्यांनी अटक