‘ड्राय आय सिंड्रोम’चा धोका वाढतोय
>> राजाराम पवार
तासन्तास मोबाईलवर व्यस्त राहणे, लॅपटॉप, टीव्हीसारख्या माध्यमांचा अतिवापर वाढल्यामुळे डोळे कोरडे होण्याच्या (ड्राय आय सिंड्रोम) समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होत असल्याने वृद्धांमध्ये ‘ड्राय आय सिंड्रोम’ची समस्या सामान्य आहे. मात्र, सध्या ‘वर्क फ्रॉम होम, मुलांचे ‘ऑनलाइन क्लासेस’ यामुळे मोबाईल, लॉपटॉपचा वापरही वाढला आहे. सतत मोबाईल, लॅपटॉपची स्क्रीन
अशी घ्या काळजी
■ लॅपटॉपवर काम करताना प्रत्येक वीस मिनिटांनंतर ब्रेक घेऊन वीस सेकंद वीस फूट लांब असलेल्या वस्तूकडे बघणे, चष्म्याचा वापर, डोळे जोरात चोळू नये, एसी किंवा पंख्याच्या वाऱ्याचा झोत थेट डोळ्यांवर येणार नाही, याची काळजी घ्यावी, पुरेशी झोप घेणे, झोपताना अंधारात मोबाईलचा वापर टाळणे, पुरेशा प्रमाणात पाणी आणि संतुलित आहार घेणे पाहिल्याने डोळ्यांवर दाब पडून डोळ्यांचे नुकसान होत असून, उपचारासाठी रुग्णालयांत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
लहानांपासून थोरांपर्यंत सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लासेसमुळे तरुण नोकरदारवर्गाबरोबरच शालेय विद्यार्थीही मोबाईल, लॅपटॉपचा वापर करत आहेत. सतत मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघितल्यामुळे डोळे सुजणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यात जळजळ होणे, कधीकधी अंधुक दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे, संगणकाच्या स्क्रीनकडे पाहताना त्रास होणे, तीव्र डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉपसारख्या उपकरणांचा वापर जास्त होत असल्यास प्रत्येकाने नियमितपणे आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा दृष्टिदोषसारखी गंभीर समस्या उद्भवू शकते, असेही नेत्रतज्ज्ञांनी म्हटले आहे.
तर लहान वयातच उद्भवेल दृष्टिदोष
■ पालकच लहान मुलांना मोबाईल देतात. त्यामुळे मुलांना लहान वयातच तासन्तास मोबाईलवर गेम खेळणे, कार्टून बघत बसण्याची सवय जडते. या वयात मोबाईलच्या स्क्रिनचा प्रकाशझोत डोळ्यावर पडल्याने मुलांमध्ये ‘मायोपिया’ म्हणजेच अल्पदृष्टीची समस्या निर्माण होते. त्यामुळे पालकांनी दक्ष राहिले पाहिजे, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.
प्रयोग नको
■ डोळ्यांचा त्रास जाणवल्यास काहीजण स्वतःच्याच मनाने मेडिकलमधून आय ड्रॉप आणून तो डोळ्यात सोडण्याचा प्रयोग करतात. मात्र, अशा प्रयोगामुळे काहीवेळा डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. डोळ्यांचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टर प्रथम डोळ्यांची तपासणी करतात व गरजेनुसार ड्रॉप लिहून देतात. त्यामुळे स्वतः आयड्रॉपचा प्रयोग न करता, डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करणे, त्यांच्या सल्ल्यानुसार आयड्रॉप घेणे आवश्यक असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List