सर्वात मोठा धक्का… राज्य मंत्रिमंडळात धनंजय मुंडे, रविंद्र चव्हाण यांना डच्चू? मस्साजोग प्रकरण भोवले, तर चव्हाण यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी?

सर्वात मोठा धक्का… राज्य मंत्रिमंडळात धनंजय मुंडे, रविंद्र चव्हाण यांना डच्चू? मस्साजोग प्रकरण भोवले, तर चव्हाण यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी?

नागपूर हिवाळी अधिवेशनाअगोदर महायुती सरकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातला आहे. यामुळे काल रात्रीपासूनच घडामोडींना वेग आला आहे. मुंबईसह नागपूरमध्ये वेगवान घडामोडी घडल्या. रात्रभर लॉबिंग सुरू होते. या जम्बो मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात येत आहे. तर काही जुन्या नेत्यांना पण संधी देण्यात येणार आहे. तर काहींना डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारात तिघांच्या नावाचा पत्ता कट झाल्याचे आतापर्यंत समोर येत आहे. दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्याचे समोर आले आहे. तर आता अजित पवार गटाच्या शिलेदारांच्या यादीत अद्याप धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले नाही तर दुसरीकडे भाजपाच्या यादीत रविंद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आले नसल्याचे दिसते.

नागपूरमध्ये बॅनरबाजी

सरकारच्या पहिल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण नागपूरात महायुतीच्या नेत्यांची जोरदार बॅनरबाजी दिसून आली. या माध्यमातून कार्यकर्त्यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न दिसून आला.महायुतीच्या विजयाचे कर्णधार म्हणून एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे एअरपोर्ट पासून विधानभवनापर्यंत मोठ-मोठे होर्डिंग आणि बॅनर्स लागले आहेत. तर चौका चौकात ‘देवा भाऊ जो बोलता है वो करता है’, अशा आशयाचे देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे होर्डिंग आणि बॅनर लागले आहेत.

राष्ट्रवादीच्या या नेत्यांना फोन

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, आदिती तटकरे, अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.

धनंजय मुंडे यांचे नाव अद्याप नाही

दरम्यान धनंजय मुंडे यांचे नाव अद्याप समोर न आल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यावरून बीडमध्ये वातावरण तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर येत आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यात वाल्मीक कराड यांच्यावर पण गंभीर आरोप करण्यात आला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून मस्साजोग ग्रामस्थांचा संताप समोर आला आहे. या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची डेडलाईन उलटून गेल्याचे म्हणत ग्रामस्थांनी सोमवारी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. छत्रपती संभाजीराजे हे मस्साजोगमध्ये काल दाखल झाले. त्यांनी याप्रकरणात आरोपींची अटक होईपर्यंत आणि चौकशी होईपर्यंत संबंधित नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची आग्रही मागणी अजितदादांकडे केली. त्यांचा रोख अर्थातच धनंजय मुंडे यांच्याकडे होता.

रविंद्र चव्हाणांकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पद

रविंद्र चव्हाणांकडे भाजप नवी जबाबदारी देणार आहे. रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. २०२९ मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी देण्यात येण्यात येत असल्याचे समजते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तारक मेहता..’मधील भिडे मास्तरांच्या लेकीने बांधली लग्नगाठ; पहा व्हिडीओ ‘तारक मेहता..’मधील भिडे मास्तरांच्या लेकीने बांधली लग्नगाठ; पहा व्हिडीओ
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत भिडे मास्तरांची लेक सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली...
मिरजेतील ‘हिंद एज्युकेशन’च्या शिक्षकासह लिपिकाला अटक; पगाराची रक्कम मंजूर करण्यासाठी लाखाची मागणी
Pune crime news – पुरोगामी पुण्यात भोंदूंची ‘बाबागिरी’, चाकूच्या धाकाने बलात्कार
शिक्षण विभागाचा अजब कारभार, वर्ष संपत आले तरी दुसरा गणवेश मिळालाच नाही; सांगलीत 1 लाख 16 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित
Satara crime news – औंधच्या युवकाचा गोपूजमध्ये खून; 12 तासात दोन आरोपी जेरबंद
New Year 2025: रोहित शर्मापासून जसप्रीत बुमरापर्यंत सर्वांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
पाटबंधारे विभागाचा अजब कारभार, कर्जतच्या पाली भूतवली धरणाचे पाणी शेतकऱ्यांना नाकारले