शेअर ट्रेडिंगच्या परताव्याचे मायाजाळ

शेअर ट्रेडिंगच्या परताव्याचे मायाजाळ

>> नवनाथ शिंदे

नागरिकांनो, शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली जादा परताव्याच्या आमिषाने तुम्हाला जर कोणी गुंतवणुकीसाठी अट्टाहास करीत असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा सुरुवातीला काही रक्कम बँक खात्यात वर्ग करून तुम्हाला सायबर चोरट्यांकडून मायाजाळ्यात अडकविले जाऊ शकते. त्यामुळे शेअर ट्रेडिंग परताव्याच्या मायाजाळापासून दूर राहिल्यास तुमची फसवणूक होऊ शकणार नाही. सोशल मीडिया, पोलिसांकडून आवाहन-जनजागृती करूनही नागरिक सायबर चोरट्यांची शिकार होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील विविध भागांतील तरुणांसह ज्येष्ठांना सायबर चोरट्यांनी अक्षरशः परताव्याच्या आमिषाने ऑनलाईन लुटीद्वारे जेरीस आणले आहे. दरदिवशी काही लाखांच्या घरात फसवणुकीचे सत्र कायम आहे. मात्र, तरीही अनेकजण सायबर चोरट्यांच्या मोहजाळ्यात अलगद अडकत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः उच्चशिक्षितांपासून अतिवरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, वकीलही या जाळ्यातून सुटले नसल्याचे तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. फसवणुकीची रक्कम एक लाख रुपयांपासून दोन कोटींवर असून, संबंधित सायबर चोरट्यांचा थांगपत्ताही लागत नाही. अनोळखी लिंक उघडून झालेली ओळख अनेकांच्या अंगलट आली आहे. मात्र, तरीही हव्यास कमी होत नसून, जादा परताव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत उतरत नाही. दिवसेंदिवस अशा घटना घडल्यानंतरही नागरिक सावध होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याभरात दामदुप्पट देण्यासह जादा परताव्याचे सायबर चोरट्यांनी दाखविलेले आमिष तक्रारदारांची आयुष्यभरातील जमापुंजी खाली करीत आहे. दरम्यान, सायबर पोलिसांकडून याबाबतची केली जाणारी जनजागृती, दरदिवशी सोशल मीडियासह वर्तमान पत्रांमध्ये सायबर फसवणुकीच्या घटनांनंतरही नागरिकांच्या डोळ्यावरची झापड उघडत नाही. अवघ्या काही दिवसांत बँक खात्यातून रक्कम कमी झाल्यानंतर आम्हाला आधी मदत करा, आमचा संसार वाचवा, आयुष्यभराची कमाई मिळवून द्या, अशाप्रकारची याचना तक्रारदारांकडून पोलिसांकडे केली जात आहे. शेअर मार्केटचा जादा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यात दिवसाला किमान 10 ते 15 तक्रारी दाखल होत आहेत. तर, किरकोळ सायबर फसवणुकीच्या तक्रारींबाबत अनेकजण अनभिज्ञ असल्याचेही दिसून आले आहे.

एक लिंक अन्, चॅटिंगद्वारे विश्वास संपादन

– सायबर चोरट्यांकडून नागरिकांना मोबाईलवर लिंक पाठविली जाते. शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास काही दिवसांत जादा परतावा देण्याची बतावणी केली जाते. त्यासाठी संबंधिताला चोरटे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करतात. त्याठिकाणी 150 ते 200 मेंबरला कशापद्धतीने दरदिवशी नफा मिळतोय, हे फक्त दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार नागरिकांकडून सुरुवातीला काही हजारांची रक्कम ऑनलाइनरीत्या गुंतवली जाते. विश्वास संपादित व्हावा, यासाठी सायबर चोरट्यांकडून काही दिवसांतच रक्कम दामदुपटीने वर्ग केली जाते. दोन ते तीन वेळेस सायबर चोरटे रक्कम संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग करून त्यांना आपलेसे करतात. सावज टप्प्यात आल्यानंतर एकदाच गुंतवणूक केल्यास मोठ्या बक्षीसाचे आमिष दाखविले जाते. यासाठी तीन ते चारजणांकडून बोलणी केली जाते. एकदाचे पैसे खात्यात आल्याबरोबर, सायबर चोरटे आणखी रक्कम तक्रारदाराकडे मागतात. त्यानंतर संपर्क बंद करून लाखो रुपयांची ऑनलाइन सफाई करतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Big Boss 18 – सलमान खानच्या शो चे पॅकअप होणार, ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले Big Boss 18 – सलमान खानच्या शो चे पॅकअप होणार, ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले
सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ यावर्षी टीआरपी मिळवण्यास असमर्थ ठरला. यामुळे या शो ला मुदतवाढ मिळत नाहीये. परिणामी...
Year Ender : 2024 मध्ये ‘या’ बाईक्सची विक्री झाली बंद, पाहा लिस्ट
250 किमीची रेंज, 45 मिनिटांत चार्ज होते फुल चार्ज; नवीन वर्षात लॉन्च होणार देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार
Photo – पाटण्याला चितपट करून प्रो कबड्डीत हरयाणाने मारली बाजी
Honda Activa की TVS Jupiter कोणत्या स्कूटरचे मायलेज जास्त ? पाहा
मोठी बातमी! सुरेश धस नरमले, प्राजक्ता माळींची मागितली माफी, नेमकं काय म्हणाले?
घाटकोपर दुर्घटनेत १७ जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीस सात महिन्यांनी अटक