नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई पटोले यांचे निधन
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव शरिरावर भंडारा जिल्ह्यातील सोकाली या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ”महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना मी मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब पटोले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की नानाभाऊ पटोले आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे”, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List