अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाचा फटका, उरणमधील रब्बी पिके डेंजर झोनमध्ये

अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाचा फटका, उरणमधील रब्बी पिके डेंजर झोनमध्ये

आज पहाटे अवकाळी पावसाने उरण तालुक्यात हजेरी लावल्याने येथील हवामान अचानक बदलले आहे. कधी दमट तर कधी वाढती थंडी आणि ढगाळ वातावरण याचा मोठा फटका वाल, तूर, उडीद, मूग, चवळी, टोमॅटो, वांगी, भेंडी अशा पिकांना बसला आहे. बदलत्या हवामानामुळे उरणमधील रब्बी पिके डेंजर झोनमध्ये असून आंब्याचा मोहरदेखील गळून पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मोठ्या कष्टाने लावलेल्या भाज्या व अन्य पिके याचे नुकसान झाले तर ते कोण भरून देणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

उरण परिसरातील चिरनेर, पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, पानदिवे, कोप्रोली, कळंबुसरे, चिरनेर, कंठवली, भोम, रानसई, वेश्वी, विंधणे, दिघोडे, केगाव, नागाव परिसरातील शेतकरी भाजीपाला पिके घेतात, तर शेकडो शेतकरी आंबा उत्पादक आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकरी शेवग्याची लागवड करतात. नुकताच आंब्याला मोहर व शेवग्याला फुले येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सातत्याने बदलत असलेले वातावरण आणि शनिवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने आंब्याला लागलेला मोहर आणि शेवग्याची फुले गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

■ काही दिवसांपासून सातत्याने बदलत चाललेले खराब हवामान आणि शनिवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकेदेखील धोक्यात आली आहेत.

■ आंबा मोहर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. यानंतरही आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची भीती येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश

आणखी अवकाळी पाऊस पडला तर आंबा मोहर, शेवग्याची फुले गळून जाण्याची शक्यता आहे. अन्य पिकांची पाहणी करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रे रोडमध्ये जलवाहिनी फुटल्याने शिवडीत पाणी पुरवठ्यावर परिणाम रे रोडमध्ये जलवाहिनी फुटल्याने शिवडीत पाणी पुरवठ्यावर परिणाम
रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रे रोड येथील उड्डाणपुलाजवळ जलवाहिनी फुटून परिसरात पाणीच पाणी साचल्याचा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला. यामुळे शिवडी...
थर्टी फर्स्टसाठी कंडोमवाटप
मुंबई लोकल – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महेश कोटीवाले यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
Big Boss 18 – सलमान खानच्या शो चे पॅकअप होणार, ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले
Year Ender : 2024 मध्ये ‘या’ बाईक्सची विक्री झाली बंद, पाहा लिस्ट
250 किमीची रेंज, 45 मिनिटांत चार्ज होते फुल चार्ज; नवीन वर्षात लॉन्च होणार देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार
Photo – पाटण्याला चितपट करून प्रो कबड्डीत हरयाणाने मारली बाजी