ईशा सिंह 15 वर्ष मोठ्या असलेल्या घटस्फोटित अभिनेत्याच्या प्रेमात ? सलमानने केले एक्स्पोज

ईशा सिंह 15 वर्ष मोठ्या असलेल्या घटस्फोटित अभिनेत्याच्या प्रेमात ? सलमानने केले एक्स्पोज

‘बिग बॉस’च्या विकेंडचा वारची चाहत्यांना प्रतिक्षा असते. ते आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी सलमान खान विकेंडच्या वारमध्ये अभिनेत्री ईशा सिंह हिला एक्स्पोज केले आहे. ईशा आणि अविनाश मिश्रा यांची जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे दोघांच्या लव्ह अँगलच्या चर्चाही वाढत चालल्या आहेत. अशातच शनिवारी विकेंडच्या वरमध्ये सलमानने ईशाला एक्स्पोज केले आहे.

विकेंडच्या वारमध्ये सलमानने ईशाला शालीन भनोटच्या नावाने टीज केले आहे. सलमानने ईशाला विचारले, शो मध्ये येण्यापूर्वी तू शेवटचा फोन कोणाला केला होता. यावेळी सलमानने शालीनबाबत इशारा करत म्हणाला की, बॉयफ्रेण्ड नसेल तर क्लोज फ्रेण्ड असेल असे म्हणत कदाचित मी त्याला ओळखत असेन. स्वभावात तो शालीन असेल असा इशारा केला. इशाला सलमानचा रोख शालिनकडे असल्याचे लक्षात आल्यावर ती लाजली. त्यानंतर तिने अभिनेत्यासोबतचे तिचे नाते स्पष्ट केले आणि सांगितले की तिचे आणि शालीनमध्ये कोणतेही प्रेमसंबंध नाहीत.ती म्हणाली शालिन फक्त माझा चांगला मित्र आहे.आम्ही एकत्र काम केले आहे म्हणून आम्ही एकमेकांशी खूप जवळचे नाते सामायिक करतो. याशिवाय आमच्यात काहीही नाही. शालिन आणि माझी घट्ट मैत्री आहे. मी त्याचा खूप आदर करतो. पण इतकंच.

त्यानंतर करणवीर मेहरानेही ईशाच्या शालिनसोबतच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. करणवीर मेहराने खुलासा केला की ‘खतरों के खिलाडी’ शो दरम्यान शालिन नेहमी ईशासोबत व्हिडिओ कॉलवर असायचा. मात्र, ईशाने हे मान्य करण्यास नकार दिला. शालिन आणि ईशाबद्दल बोलायचे झाले तर दोघांनी बेकाबू या शोमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा आहे. मात्र, बिग बॉसमध्ये ईशा अविनाशसोबत लव्ह अँगल करताना दिसली होती. अशा परिस्थितीत सलमानने त्याचे सत्य जगाला सांगितले. शालिनबद्दल बोलायचे तर तो घटस्फोटित आहे. शालीनचे पहिले लग्न अभिनेत्री दलजीत कौरसोबत झाले होते. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. शालिनला एक मुलगाही आहे.शालिन आणि ईशाच्या वयात १५ वर्षांचे अंतर आहे. शालिन 41 वर्षांची आहे, तर ईशा 26 वर्षांची आहे. शालिन आणि अविनाश यांच्यात ईशाचे नाते कोणासोबत खरे आहे हे आता तीच सांगू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझ्याविषयी अपशब्द बोलून देशाचा विकास होणार का? – केजरीवाल माझ्याविषयी अपशब्द बोलून देशाचा विकास होणार का? – केजरीवाल
पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी सन्मान योजनेअंतर्गत दिल्लीतील सर्व पुजारी आणि ग्रंथींना दरमहा 18 हजार रुपये देण्याची घोषणा आम आदमी पार्टीचे...
खो – खो वर्ल्ड कपची धावाधाव 13 जानेवारीपासून, पुरुष गटात 20 तर महिलांच्या गटात 19 संघांचा समावेश
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर वॉरंटची टांगती तलवार
अहमदाबादमध्ये आयुष, अभिषेकचा ‘रनोत्सव’; आयुष म्हात्रेने 181 धावा ठोकत रचला विश्वविक्रम
चारकोपमध्ये आढळले मृत अर्भक
दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांविरोधात अटक वॉरंट
सांगली, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण उपांत्यपूर्व फेरीत