दक्षिण कोरियानंतर कॅनडात विमान अपघात, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

दक्षिण कोरियानंतर कॅनडात विमान अपघात, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

दक्षिण कोरियात झालेल्या भीषण विमान अपघातानंतर आता आणखी एक विमान दुर्घटना घडली आहे. कॅनडातील हॅलिफॅक्स विमानतळावर कॅनडा एअरलाइन्सचे विमान घसरले. लॅंडिंगदरम्यान विमानाला आग लागल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, PAL एअरलाइन्सच्या विमानाने (AC2259) सेंट जॉन्स येथून उड्डाण केले होते. दरम्यान हॅलिफॅक्स विमानतळावर लॅंडिंग करत असताना विमान धावपट्टीवरुन घसरले. त्यामुळे लँडिंग गेअर तुटल्याने आग लागली. अपघातावेळी या विमानात किती प्रवासी होते याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या अपघातानंतर हे विमानतळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

लँडिंग करताना विमान थेट भिंतीवर जाऊन धडकले, भीषण स्फोटात 179 प्रवासांचा मृत्यू

 

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List