पंढरपूरजवळ भाविकांच्या बसचा भीषण अपघात, दोन जण ठार
पंढरपूर ते टेंभुर्णी या मार्गावरील भटुंबरे गावच्या हद्दीत पंढरपूर पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर खाजगी बस आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य सहा ते आठ भाविक जखमी झालेले आहेत. जखमी भाविकांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अपघातग्रस्त बस ही पुणे जिल्ह्यातील असून मयत भाविक मावळ तालुक्यातील आहेत अशी प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
पंढरपूर – टेंभुर्णी या मार्गावरील पंढरपूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भटुंबरे गावाच्या हद्दीत रविवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हभप तुकाराम खेडलेकर महाराज मठाच्या समोर हा अपघात झाला. टेंभुर्णीकडून पंढरपूरकडे येत असलेल्या भाविकांची बसची पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रकसोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकचा समोरचा भाग चक्काचूर झालेला आहे.
बस मधील दोन प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला असून अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही वाहनांचा अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे वृत्त समजतात तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आणि इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांचे मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List