तंत्रज्ञान – उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा

तंत्रज्ञान – उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा

>> महेश कोळी

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू होऊ शकते. यासाठी दूरसंचार विभाग आणि ट्रायने तयारी जवळपास पूर्ण केली आहे. यामध्ये एलॉन मस्क यांची स्टारलिंक आघाडीवर असल्याचे समजते. सध्या भारतातील अनेक क्षेत्रांत मोबाईल नेटवर्क पोहोचलेले नाही. उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर ही उणीव भरून निघणार आहे. इंटरनेट सेवेशी जोडले गेल्याने या भागातील लोकांशी संवाद साधणे सोपे होईल.

एकविसाव्या शतकात घडणाऱया अभूतपूर्व क्रांतियुगाच्या मुळाशी संगणक आणि त्यापेक्षा संगणकावरील इंटरनेट नामक सुविधा आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेटचा शोध लागला तेव्हा हा शोध उक्रांतीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असे कुणाला वाटलेही नसेल. सुरुवातीपासूनच या शोधाचा व्यावसायिक पैलू विकसित होण्यास सुरुवात झाल्यामुळे इंटरनेट आधी विकसित देशांची मत्तेदारी बनून राहिला होता. परंतु हळूहळू विकसनशील देशांच्या दिशेने इंटरनेटची पावले वळली आणि आता जगभरात इंटरनेट हा मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण पैलू बनून गेला आहे. अनेक सेवा इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. नवनवीन सेवा इंटरनेटशी जोडल्या जात आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट तळहातावर आले आणि मग त्याच्या विकासाचा वेग शतगुणित झाला. आता बसल्या जागेवरून आपण अनेक गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो. फोर-जीचे युग आल्यानंतर भारतात बँकिंगपासून अनेक क्षेत्रात झालेला कायापालट आपण पाहत आणि अनुभवत आहोत. मात्र अद्याप देखील जगातील विविध देशांबरोबरच भारतातही अशी बरीच ठिकाणे आहेत जेथे अद्याप इंटरनेट सेवा, ऑप्टिकल फायबर पोहोचले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या भागात मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किंवा ऑप्टिकल फायबर लाइन टाकण्यासाठी खूप खर्च येतो. यामुळे दूरसंचार कंपन्या इच्छा असूनही तेथे नेटवर्क पोहोचवू शकत नाहीत. परंतु इंटरनेटच्या क्षेत्रात आलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे आता ही उणीव दूर होणार आहे. हे नवे तंत्रज्ञान म्हणजे सॅटेलाईट इंटरनेटसेवा. उपग्रहांच्या साहाय्याने छायाचित्रे तसेच विविध प्रकारचा डेटा मिळू लागल्यानंतर झालेली प्रक्षेपणक्रांती आपण पाहिली आहे. पण आता याच उपग्रहांद्वारे थेट इंटरनेटसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नसून नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी दूरसंचार विभाग आणि ट्रायने तयारी जवळपास पूर्ण केली आहे. या नव्या सेवेमुळे दूरसंचार क्षेत्राचे भविष्य पूर्णपणे बदलून जाईल, असे काहींचे म्हणणे आहे. पण प्रत्यक्षात तसे घडेल का?

सॅटेलाईट इंटरनेटसेवा कशा प्रकारे काम करते? त्याचे नेमके फायदे काय आहेत? यामध्ये कोणकोणत्या देशी-विदेशी कंपन्या सहभागी आहेत? हे या निमित्ताने जाणून घेणे औचित्याचे ठरेल.

या शर्यतीत मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेल व्यतिरिक्त एलान मस्कची स्टारलिंक आणि अॅमेझॉन आघाडीवर आहेत. वास्तविक पाहता भारतात सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी जगप्रसिद्ध अब्जाधीश एलॉन मस्क याची स्टारलिंक ही कंपनी अनेक महिन्यांपासून खटाटोप करत होती. स्टारलिंक ही स्पेस एक्सची उपकंपनी आहे. मस्कच्या या कंपनीने जवळपास 2700 उपग्रह अवकाशात प्रस्थापित करून ग्लोबल स्टारलिंक नेटवर्क तयार केले आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसारख्या अनेक देशांत बीटा टेस्टिंगच्या माध्यमातून या उपग्रहाद्वारे इंटरनेटसेवेचा वापर लोक करत आहेत.

सॅटेलाईट इंटरनेट कसे काम करते?

यामध्ये जेव्हा वापरकर्ते इंटरनेटसाठी विनंती करतात तेव्हा ती विनंती प्रथम सॅटेलाइट डिशमधून उपग्रहाकडे पाठविली जाते. उपग्रह जमिनीवर असलेल्या नेटवर्क ऑपरेशन सेंटरला वापरकर्त्यांच्या विनंत्या पाठवतो. हे केंद्र इंटरनेटशी जोडलेले असल्याने तेथून आवश्यक डेटा गोळा केला जातो आणि उपग्रहाद्वारे वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर परत पाठविला जातो. उपग्रहाद्वारे पाठवलेला डेटा वापरकर्त्याच्या डिशवर प्राप्त होतो, नंतर मॉडेम ते डिकोड करतो आणि वापरकर्त्याच्या संगणकावर किंवा इतर उपकरणावर प्रसारित करतो.सॅटेलाइट इंटरनेट उच्च बँडविड्थ हाताळू शकते. यामुळे पिक टाइममध्ये बरेच युजर्स असले तरीही इंटरनेट स्पीडमध्ये फरक पडणार नाही.

उपग्रह सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेट वापरण्यासाठी मोबाईल नेटवर्क किंवा ऑप्टिकल फायबर किंवा लीज्ड लाइनवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. स्टारलिंक सध्या 250 ते 300 एमबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा देत आहे. भारतात ओरिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील वनक्षेत्र आणि जम्मू-कश्मीरच्या डोंगराळ भागात सॅटेलाईट इंटरनेटद्वारे कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते. इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्त पैसे दिले जात असले तरी वापरकर्त्यांना इंटरनेटचा योग्य स्पीड मिळत नाही. यावर सॅटेलाइट इंटरनेट सेवा उपयुक्त ठरू शकते.
(लेखक संगणक अभियंता आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Big Boss 18 – सलमान खानच्या शो चे पॅकअप होणार, ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले Big Boss 18 – सलमान खानच्या शो चे पॅकअप होणार, ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले
सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ यावर्षी टीआरपी मिळवण्यास असमर्थ ठरला. यामुळे या शो ला मुदतवाढ मिळत नाहीये. परिणामी...
Year Ender : 2024 मध्ये ‘या’ बाईक्सची विक्री झाली बंद, पाहा लिस्ट
250 किमीची रेंज, 45 मिनिटांत चार्ज होते फुल चार्ज; नवीन वर्षात लॉन्च होणार देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार
Photo – पाटण्याला चितपट करून प्रो कबड्डीत हरयाणाने मारली बाजी
Honda Activa की TVS Jupiter कोणत्या स्कूटरचे मायलेज जास्त ? पाहा
मोठी बातमी! सुरेश धस नरमले, प्राजक्ता माळींची मागितली माफी, नेमकं काय म्हणाले?
घाटकोपर दुर्घटनेत १७ जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीस सात महिन्यांनी अटक