खेळता खेळता घड्याळ्याचा सेलच गिळला, डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत दिले चिमुकल्याला जीवनदान

खेळता खेळता घड्याळ्याचा सेलच गिळला, डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत दिले चिमुकल्याला जीवनदान

लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. चिमुकल्यांचे नको ते उद्योग कधी कधी जीवावर बेततात. अशीच एक घटना राजस्थानमधील कोटा येथे उघडकीस आली आहे. एका सहा वर्षाच्या मुलाने खेळता खेळता घड्याळाचा सेल तोंडात टाकला आणि गिळला. त्यानंतर मुलाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत मुलाला जीवनदान दिले.

काय घडलं नेमकं?

कोटामध्ये एका सहा वर्षीय मुलाने खेळताना घड्याळ्याचा लहानसा सेल तोंडात टाकला आणि गिळला. सेल गिळल्यानंतर सेल चिमुकल्याच्या श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाऊन अडकला. यानंतर मुलाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. पालकांनी मुलाला तात्काळ रुग्णालयात नेले.

डॉक्टरांनी मुलाचा एक्स रे आणि सीटी स्कॅन काढला. यात फुफ्फुसात 1 बाय 1 चा सेल अडकल्याचं दिसलं. यानंतर डॉक्टरांनी सर्व आवश्यक तपासण्या करत शुक्रवारी मुलाची सर्जरी केली. सर्जरीनंतर मुलाच्या फुफ्फुसातील सेल बाहेर काढत डॉक्टरांनी त्याला जीवनदान दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Prajakta Mali : सुरेश धस यांच्यासोबत वाद पेटणार? प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना भेटणार, काय आहे अपडेट Prajakta Mali : सुरेश धस यांच्यासोबत वाद पेटणार? प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना भेटणार, काय आहे अपडेट
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 19 दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. त्याविरोधात बीड जिल्ह्यातील...
आले तुफान किती, जिद्द ना सोडली..; सूरज चव्हाण स्वत:च बांधतोय ‘बिग बॉस’चा बंगला
गोविंदाच्या मुलीचं मासिक पाळीबद्दल वादग्रस्त वक्तव्य; नेटकरी म्हणाले ‘हिला समजवा..’
नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई पटोले यांचे निधन
अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाचा फटका, उरणमधील रब्बी पिके डेंजर झोनमध्ये
राज्य सरकारच्या तिजोरीला महापालिकेचा टेकू ! तीन करांतून पाच वर्षांत दिले 559 कोटी
शेअर ट्रेडिंगच्या परताव्याचे मायाजाळ