रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू महिलांचे; दगावणाऱ्यांमध्ये 87 टक्के महिला
राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर गेल्या साडेतीन वर्षांत झालेल्या अपघातात दगावणाऱ्या नागरिकांमध्ये 87 टक्के महिला आहेत. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती.
राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यात एकूण 14,170 अपघात झाले. त्यात 7,229 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांमध्ये 6,326 महिलांचा समावेश आहे. 2021 मध्ये 1 हजार 368, 2022 मध्ये 1 हजार 632, 2023 मध्ये 1 हजार 867 तर जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 1 हजार 459 महिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. राज्यात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर अपघात व मृत्यू जास्त असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्गांवर 2021 मध्ये 7 हजार 501 अपघातांत 4 हजार 80 मृत्यू झाले तर राज्य महामार्गावर 6 हजार 328 अपघातांत 3 हजार 411 लोकांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्गावर 9 हजार 417 अपघातांत 4 हजार 923 लोकांचा मृत्यू झाला तर राज्य महामार्गावर 4 हजार 822 अपघातांत 2 हजार 548 मृत्यू झाले. 2023 मध्ये राष्ट्रीय महामार्गावर 10 हजार 881 अपघातांत 5 हजार 780 मृत्यू झाले तर राज्य महामार्गावर 4 हजार 822 अपघातांत 2 हजार 548 मृत्यू झाले. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर 9 हजार 348 अपघातांत 4 हजार 681 मृत्यू झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर 4 हजार 822 अपघातांत 2 हजार 548 मृत्यू झाले.
z राज्यात 2021 ते 2023 दरम्यान रस्ते अपघात दगावणाऱयांमध्ये 18 वर्षांखालील 1 हजार 229 जणांचा समावेश आहे. 2021 मध्ये 373 मृत्यू, 2022 मध्ये 454 मृत्यू, 2023 मध्ये 402 मृत्यूंचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List