64 घरांची राणी! बुद्धिबळात कोनेरू हम्पीने रचला इतिहास, पटकावला World Rapid Chess Championship किताब

64 घरांची राणी! बुद्धिबळात कोनेरू हम्पीने रचला इतिहास, पटकावला World Rapid Chess Championship किताब

हिंदुस्थानची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने धमाकेदार कामगिरी करत FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2024 च्या किताबावर दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. तीने इंडोनेशियाच्या इरीन सुकंदर हिचा पराभव केला आहे. या विजयासह दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरवार अशी कामगिरी करणारी ती दुसरी बुद्धिबळपटू ठरली आहे.

अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी सहा खेळाडू 7.5 गुणांसह कोन्हेरू हम्पी सोबत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर होते. या खेळाडूंमध्ये जू वेनझुन, कॅटरिना लागनो, हरिका द्रोणावल्ली, अफरोजा खामदामोवा, टॅन झोंग्यी आणि इरीन या खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंचे सामने अनिर्णित सुटले, परंतु हम्पीने इंडोनेशियाच्या इरिन सुकंदरचा अंतिम फेरीत पराभव केला आणि विजेतेपद सुद्धा पटकावले. 2023 साली हम्पीला परभावला सामोरे जावे लागले होते. परंतु यावेळी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत तिने विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2019 साली जॉर्जिया येथे कन्हेरू हम्पीने वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

26/11 मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणात मोठी अपडेट; तहव्वुर राणा याला भारतात आणणार, कुटनीतीच्या यशानंतर मोठे पाऊलं 26/11 मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणात मोठी अपडेट; तहव्वुर राणा याला भारतात आणणार, कुटनीतीच्या यशानंतर मोठे पाऊलं
26/11 मुंबई दहशतवादी हल्ला भारतीय विसरले नाहीत. या हल्ल्यातील पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा याला लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार...
“लोकांनी साथ सोडली पण..”; हार्दिकला घटस्फोटाचं दु:ख पचवणं अद्याप कठीण, नताशाची आली आठवण?
अनुराग कश्यपचा मुंबई सोडण्याचा निर्णय; बॉलिवूडवर तीव्र नाराजी, म्हणाला “मी थकलोय..”
Photo – नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विविध फुलांसह संत्र्यांची आकर्षक सजावट
Delhi assembly election 2025 – केजरीवाल यांचं सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र, मागितलं चार प्रश्नांचं उत्तर
किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन
खूप झालं आता, संघाच्या रणनितीनुसार खेळणार नसाल तर ‘नारळ’ देणार; गंभीरचा पंत, कोहलीला इशारा