दादरमधील हनुमान मंदिरात आज शिवसेनेची महाआरती, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित
दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस बजावणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. या मंदिराला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज भेट देणार असून तिथे महाआरती केली जाणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.
”साडे चार ते पाचच्या दरम्यान या मंदिरात आम्ही महाआरती करू. मी स्वत: आदित्य ठाकरे, महेश सावंत व हजारो शिवसैनिक, हमाल बांधव या महाआरतीला उपस्थित राहणार आहोत. भाजपची इच्छा असेल तर त्यांनी यावं त्या महाआरतीला. आम्ही त्यांच्या हातात गदा व घंटा देऊ’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
दादर पूर्व येथे मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्र. 12 जवळील हनुमान मंदिराचे बांधकाम अनधिकृत ठरवून भाजप सरकारने त्यावर हातोडा उगारला आहे. हे बांधकाम सात दिवसांत हटवावे अन्यथा आम्ही कारवाई करून पाडकामाचा खर्चही वसूल करू, अशी मुजोर नोटीस मध्य रेल्वेच्या कार्यकारी सहाय्यक मंडल इंजिनीयरकडून मंदिराच्या विश्वस्तांना बजावण्यात आली आहे. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये आज वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाविकांसह सर्वच मुंबईकरांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List