नागपूर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता दुरावली; शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार

नागपूर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता दुरावली; शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार

लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी महायुती सरकारची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. पण सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे.

महायुती सरकारचे नागपूरमधील पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे पहिल्याच अधिवेनात शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. 2019मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली होती. त्यामुळे या अधिवेशनातही कर्जमाफी होईल, अशी शेतकऱयांची अटकळ होती.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत कोणतेही निर्देश दिले नसल्याने कर्जमाफी होणार नाही.

सहकार विभागातील सूत्रांशी संपर्क साधला असता कर्जमाफी देण्यासाठी तयारीबाबत कोणतेही निर्देश अद्याप नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सहा लाख शेतकऱ्यांना लाभ नाही

2017च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या सहा लाखांवरील शेतकऱयांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतही लाभ मिळू शकला नाही. यामध्ये 1 हजार 644 कोटी रुपयांची कर्जमाफी तर 3 हजार 985 कोटी रुपयांची एकरकमी परतफेड योजना आणि 346 कोटी रुपये प्रोत्साहन लाभापोटी देणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना 5 हजार 975 कोटी रुपयांची कर्जमाफी प्रलंबित आहे.

2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेत 1 एप्रिल 2001 पासून पीक व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या आणि 30 जून 2016 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना आणली. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली. तसेच 2015-16, 2016-17 या आर्थिक वर्षात पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱयांना 25 हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. या योजनेंतर्गत 18 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात फडणवीसांचा मोठा निर्णय, उज्वल निकम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात फडणवीसांचा मोठा निर्णय, उज्वल निकम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
कल्याणमध्ये आईकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात...
थर्टी फर्स्टला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, मध्य रेल्वेच्या या मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
‘करुणा ताई तुम्ही सुद्धा एक स्त्री…’, प्राजक्ता माळीचे भावनिक आवाहन
चेहऱ्यावर वैताग, भय… भांबावलेपण… प्राजक्ता माळीला अश्रू अनावर; पत्रकार परिषदेत काय काय म्हणाली?
लग्नाआधीच प्रेग्नेंट; घटस्फोटानंतर 7 वर्ष लहान अभिनेत्याच्या प्रेमात; राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली बॉलिवूड अभिनेत्रीची लव्ह लाइफ फारच चर्चेत
Prajakta Mali PC : प्राजक्ता माळींनी सुरेश धसांना सुनावलं, म्हणाल्या माझ्या चारित्र्यावर…
‘राजकारणात कलाकारांना…’, माझा सुरेश धस यांना एकच प्रश्न? प्राजक्ता माळी थेट भिडल्या