Mumbai Local Mega Block : ऐकाहो! येत्या रविवारी लोकलने प्रवास करत असाल तर…! 3 मर्गांवर ‘असा’ असेल मेगा ब्लॉक

Mumbai Local Mega Block : ऐकाहो! येत्या रविवारी लोकलने प्रवास करत असाल तर…! 3 मर्गांवर ‘असा’ असेल मेगा ब्लॉक

रविवार म्हटला की सुट्टीचा वार! या दिवशी सरकारी कार्यालये, अनेक खासगी कार्यालये यांना सुट्टी असते. त्यामुळे बहुतेक कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. पण सुट्टीचा वार असल्यामुळे अनेकजण आपल्या कुटुंबासह नातेवाईकांकडे, मित्रांकडे किंवा फिरण्यासाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जातात. यासाठी हजारो प्रवासी हे मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतात. तसेच अनेक खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी या दिवशीसुद्धा कामाला जातात. अशा कर्मचाऱ्यांची संख्या लाखात असेल. त्यामुळे मुंबई कधीच थांबत नाही, असं मानलं जातं. विशेष म्हणजे रविवारी मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल देखील धावत असते. पण तरीही पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी रेल्वे मार्गावर दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. तसा या रविवारी देखील तीन मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक कसा असेल? याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात येत्या रविवार 15 डिसेंबरला मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्यांच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे अप (मुंबईच्या दिशेला येणाऱ्या) मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन करण्यात येणार आहे.

पुढील मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.

  1. ट्रेन क्रमांक 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
  2. ट्रेन क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
  3. ट्रेन क्रमांक 13201 पटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  4. ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  5. गाडी क्रमांक 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
  6. ट्रेन क्रमांक 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  7. ट्रेन क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.

  1. ट्रेन क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस
  2. गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पवन एक्सप्रेस
  3. ट्रेन क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनथपुरम नेत्रावती एक्सप्रेस
  4. सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग (पोर्ट लाईन वगळून)

हार्बर लाइन ब्लॉक विभाग

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभाग

  • पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि
    ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष लोकल चालवण्यात येतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
  • ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू क्षणाची डुलकी, दुर्घटनांना निमंत्रण; भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू
चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील परलडका परिसरात शनिवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना...
छत्रपती शिवाजी महाराज की जय! लडाखमध्ये चीन सीमेवर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
अझरबैजान विमान दुर्घटना प्रकरणी व्लादिमीर पुतिन यांनी मागितली माफी, वाचा नेमकं काय म्हणाले…
कल्याणमध्ये पाण्याच्या टाकीचा ब्रिज कोसळला, एकाचा मृत्यू, 2 ते 3 जण जखमी
‘प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही, निषेध म्हणून मीसुद्धा आता…’, सुरेश धस यांची घोषणा
अमिताभ बच्चनपासून तृप्ती डिमरीपर्यंत, बॉलिवूड स्टार्स रिअल इस्टेटमध्ये का करतायत मोठी गुंतवणूक?
नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली मुरुडला पर्यटकांची पसंती; सुमद्रकिनारे गर्दीने फुलले