अभिनेता अल्लू अर्जुनला तेलंगणा हायकोर्टाकडून जामीन मंजूर
हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहातील चेंगराचेंगरी आणि महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याला जामीन मंजुर केला आहे. तेलंगणा हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेली 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा रद्दबातल करत अल्लू अर्जुनला जामीन दिला आहे.
अल्लू अर्जुनला शुक्रवारी राहत्या घरातून अटक करण्यात आली. यानंतर त्याला तात्काळ कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले होते. कनिष्ठ न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला तेलंगणा हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टाने सुनावणीनंतर अल्लू अर्जुनला जामीन मंजुर केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List