दोघींशी लग्न, तिसरीसोबत सुपारी फोडली; चौथ्या लग्नाच्या मुंडावळ्या बांधणाऱ्या भामट्याची पोलीस ठाण्यात वरात

दोघींशी लग्न, तिसरीसोबत सुपारी फोडली; चौथ्या लग्नाच्या मुंडावळ्या बांधणाऱ्या भामट्याची पोलीस ठाण्यात वरात

आधी दोघींशी लग्न. मग तिसरीसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी सुपारी फोडली. हे कमी म्हणून की काय चौथीबरोबर संसार थाटण्यासाठी बोलणी करून मुंडावळ्या बांधण्याच्या तयारीत असणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या ठगाची वरात लग्न मंडपातून निघण्याऐवजी पोलीस ठाण्यात निघाली आहे. नेरळ येथे हा प्रकार घडला असून योगेश हुमने (३३) असे आरोपीचे नाव आहे. लग्न करून नववधूचे दागिने आणि आर्थिक लूट करून चैनी करण्यासाठी अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी योगेशवर गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील जामगे येथील राहणारा आहे. दाखल तक्रारीच्या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांच्या पथकाने आरोपीला शिताफीने अटक केली. पत्नीच्या नावावर असलेली कार आपल्या नावावर करण्यासाठी योगेश नेरळला पत्नीला भेटायला आला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलीस खाक्या दाखवताच योगेशचे कारनामे बाहेर आले.

योगेशने आजवर अनेक अविवाहित मुलींची फसवणूक केली आहे. दोन मुलींशी लग्न करून तिसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रमदेखील त्याने पार पाडला होता. त्यातच चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्यासाठी मुलीच्या घरच्यांशी बोलणीदेखील सुरू असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे फसवणूक झालेल्या महिलांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचादेखील समावेश आहे.

पत्नीनेच फोडले बिंग

नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले येथील 34 वर्षीय पीडित विवाहितेने योगेश विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पती मानसिक, आर्थिक फसवणूक करत असून त्याचे या आधी लग्न झाले असताना माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे म्हटले होते. यानंतर योगेशच्या भामटेगिरीचे बिंग फुटले आणि त्याचे कारनामे चव्हाट्यावर आले.

ही होती मोडस ऑपरेंडी

ज्यांचे लग्न जुळत नाही किंवा ज्यांचे वय अधिक झाले आहे अशा महिलांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून योगेश ओळख निर्माण करायचा. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम तो करीत होता. विवाहित असतानाही त्याने अविवाहित असल्याचे भासवून अनेक पीडितांना लुटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : या निवडणुका झाल्या की लाडकी बहीण योजना बंद, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य, म्हणाले काय? Ladki Bahin Yojana : या निवडणुका झाल्या की लाडकी बहीण योजना बंद, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य, म्हणाले काय?
लाडकी बहीण योजनेचा हप्ता (Ladki Bahin Yojana Installment) नुकताच राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. ही योजना चालवणे...
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर अनुपम खेर-हंसल मेहता यांच्यात बाचाबाची; म्हणाले ‘ढोंगी’
हृतिक रोशनच्या पूर्व पत्नीने भाड्याने दिलं मुंबईतील घर; दर महिन्याला मिळणार इतके लाख रुपये
प्राजक्ता माळी-सुरेश धस यांच्या वादावर अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले..
ईशा सिंह 15 वर्ष मोठ्या असलेल्या घटस्फोटित अभिनेत्याच्या प्रेमात ? सलमानने केले एक्स्पोज
दक्षिण कोरियानंतर कॅनडात विमान अपघात, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
पंढरपूरजवळ बस व ट्रकचा भीषण अपघात, दोन भाविकांचा मृत्यू; 32 जखमी