इस्रायलचा बेरूतवर हल्ला, हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा मीडिया प्रमुख ठार
इस्रायलने हिजबुल्लाहवर हल्ला सुरूच ठेवला आहे. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हल्ला करून हिजबुल्लाच्या प्रवक्त्याला ठार मारले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाच्या प्रवक्त्यासह किमान सहा जण ठार झाल्याची पुष्टी लेबनॉनने केली आहे. तर 50 हूनअधिक जण जखमी झाले आहेत.
मध्य बेरूतमधील सीरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयावर आयडीएफच्या हल्ल्यात अफिफ मारला गेला. इस्रायलने अद्याप हिजबुल्लाच्या प्रवक्त्याच्या हत्येला दुजोरा दिलेला नाही. त्यानंतर काही वेळातच मार एलियास भागात एक हल्ला झाला ज्यामध्ये दोन जण ठार झाले आणि 22 हून अधिक लोक जखमी झाले. मार एलियासचा परिसर खूप दाट लोकवस्तीचा आहे. इस्रायलच्या विमानांनी या भागात बॉम्बहल्ला केला. एएफपीच्या वृत्तानुसार, हवाई हल्ल्यानंतर सायरन वाजू लागले .
मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक स्टोअर आणि वाहनावर बॉम्बहल्ले करण्यात आले. हिजबुल्लाचा प्रवक्ता मारला गेल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, बेरूतमधील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद राहतील. इस्त्रायली हल्ल्यात एकाच ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाला तर 14जण जखमी झाले. इस्त्रायली लष्कराने सांगितले की, दोन दिवसांत 200 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये किमान 11 लोक ठार झाले असून 50 हून अधिक जखमी झाले आहेत
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List