शिवतीर्थावर निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम; हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यस्मरण

शिवतीर्थावर निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम; हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यस्मरण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 12व्या स्मृतीदिनानिमित्त शिवतीर्थावर आज निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम झाला होता. मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून लाखो शिवसैनिकांचा महासागर शिवतीर्थावर लोटला होता. लाडक्या साहेबांच्या आठवणींना उजाळा देत समस्त हिंदू, निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि आबालवृद्ध नागरिक स्मृतीस्थळावर पुष्पार्पण करून नतमस्तक झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या तसबिरीवर चाफ्याची फुले वाहून बाळासाहेबांना वंदन केले. या वेळी शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने स्मृतीस्थळाचा परिसर दुमदुमला.

राहुल गांधी यांनी केले शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आज शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना जाहीर अभिवादन करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना जोरदार चपराक लगावली आहे. राहुल गांधी यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. माझे विचार आणि संवेदना उद्धव ठाकरे, आदित्य आणि संपूर्ण शिवसेना परिवारासोबत आहेत, अशा भावना राहुल गांधी यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी मणिपूर ‘सेफ’ करा!; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल आधी मणिपूर ‘सेफ’ करा!; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. मणिपूर आणि आसामच्या सीमेवर असणाऱ्या जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचा मृतदेह...
ईडीच्या धाडी पडताच दिल्लीतील आपच्या मंत्र्याचा राजीनामा; परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांचे केजरीवाल यांना पत्र
मोदींच्या राजवटीत फक्त अदानीच सेफ; प्रियंका गांधी यांचा जोरदार हल्ला
सगळ्यांचा नाद करायचा, पण माझा नाही! शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा
मुंबईवर अदानीची सुलतानी, बीकेसीत महाविकास आघाडीची दणदणीत; उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसह महाराष्ट्रद्रोह्यांना ठणकावले…
भाजपने राज्यात देशभरातून 90 हजार बूथ एजंट पेरले! पंकजा मुंडे यांनीच केली पोलखोल
मणिपूरमध्ये अराजक; मुख्यमंत्र्यांसह 10 भाजप आमदारांची घरे पेटवली; भाजप सरकार अडचणीत…