ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही; शरद पवारांचा सरकारवर निशाणा

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही; शरद पवारांचा सरकारवर निशाणा

माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या टेंभुर्णीतील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, असे ते म्हणाले. ईडीच्या कारवाईसंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले.

माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या टेंभुर्णीतील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मला देखील ईडीची नोटीस आली होती. मी राज्य सरकारी बँकेचे पैसे काढल्याचे सांगण्यात आले होते. पण मी राज्य सहकारी बँकेचा सभासद देखील नव्हतो, तरी मला नोटीस आली. मी ईडीच्या कार्यालयाच्या जवळ गेलो त्यानंतर, अधिकारी आणि पोलीस प्रशासन म्हणले आमची चूक झाली. त्यांनी मला हात जोडल्याचे शरद पवार म्हणाले.

माझ्या खासदारकीचा निधीसुद्धा माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना विश्वासावर खर्च करायचे अधिकार दिले होते. पण राज्यात सरकार बदलले, आपला पक्ष फुटला त्यावेळी हा माढ्याचा गडी कुठे गेला कळलाच नाही, असे शरद पवार म्हमाले. मी विचारले तेव्हा ईडीची भीती आहे असे सांगितले होते असं शरद पवार म्हणाले. संकट आल्यावर ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाची भीती नाही, असेही शरद पवार म्हणाले. गैर कारभार केल्यावर भीती वाटते असेही पवार म्हणाले. निवडणुका लागल्यानंतर आमदार बबनदादा शिंदे हे परत माझ्याकडे आले. चुकलं म्हणाले. तिकीट मागायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ते चार पाच वेळा आले. मी म्हणलं आता नव्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे. पण त्यांच्या डोक्यात नवा म्हणजे एकच होता तो म्हणजे त्यांचा लेक असा टोला देखील पवारांनी आमदार शिंदेंना लगावला.

दोन वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. महाराष्ट्रातील 64 हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. 62 लाख तरुण राज्यात बेरोजगार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोदींनी उद्योगपतींचे 16000 कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. शिंदे-फडणवीस अशा राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीत जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून...
Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान
‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“श्रीवल्ली मेरी बायको, पुरी दुनियाको दिखाएगा…” ‘पुष्पा 2’ चा धमाकेदार ट्रेलर; रोमान्सपासून ते एक्शनपर्यंत सर्वच खतरनाक!
चरबी कमी करण्यासाठी दररोज प्या ‘हे’ 5 पेय
बुद्धी तल्लख बनवायची असेल तर रोज अंडी खा, अभ्यासकांचा दावा
मुंबई, महाराष्ट्रावर अदानीच्या सुलतानीचे संकट; उद्धव ठाकरे यांचा घणाघात