14 पेन्सिल बॅटरी, पिन, ब्लेड अल्पवयीन मुलाच्या पोटातून काढल्या 65 वस्तू, शस्त्रक्रियेच्या काही तासाने मृत्यू

14 पेन्सिल बॅटरी, पिन, ब्लेड अल्पवयीन मुलाच्या पोटातून काढल्या 65 वस्तू, शस्त्रक्रियेच्या काही तासाने मृत्यू

उत्तर प्रदेशच्या हातरसध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या पोटातून 14 पेन्सिल बॅटरी, पिन, ब्लेड, फुग्यांसहित 65 वस्तू काढल्या आहेत. डॉक्टरांनी 28 ऑक्टोबर रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र दुर्देवाने त्याला वाचवता आले नाही. शस्त्रक्रियेच्या काही तासानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला 13 ऑक्टोबर रोजी पोटाचा त्रास होऊ लागला आणि श्वास घ्यायलाही अडथळा वाटू लागला. ज्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्याला आगरा येथील रुग्णालयात घेऊन गेले. तिथून त्याला जयपूरच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र नेमके कारण समजले नाही. त्यानंतर त्या मुलाला अलिगडच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. 26 ऑक्टोबर रोजी त्याची पोटदुखी वाढली त्यामुळे कुटुंबिय त्याला पुन्हा अलिगडच्या रुग्णालयात घेऊन गेले. त्याच्या पोटाचे अल्ट्रासाउंड केले असता त्याच्या पोटात वस्तू असल्याचे कळले. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला सफदरगंज रुग्णालयात पोहोचले.

रुग्णालय प्रशासनानुसार, अल्पवयीन मुलाचा जीव वाचविण्यासाठी पोटातल्या वस्तू बाहेर काढणे गरजेचे होते. पाच तासांची जटील शस्त्रक्रिया करुन त्या वस्तू बाहरे काढण्यात आल्या. त्या वस्तू 368 ग्रॅमच्या होत्या. त्या अल्पवयीन मुलाने त्या वस्तू गिळल्या होत्या.मात्र त्या वस्तूंमुळे त्याच्या आतड्यांना संसर्ग झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन ! हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन !
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा...
मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातंय! – आदित्य ठाकरे
Photo – पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ
शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला
शिवसेनाप्रमुखांची मशाल हाती घ्या, तुमच्या मताने ही बेबंदशाही जाळून भस्म करून टाका; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Video – बेबंदशाहीविरोधात मी लढाईला उतरलोय, मला साथ द्या; उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन