पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; 12 माजी नगरसेवकांनी केलं पक्षांतर

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; 12 माजी नगरसेवकांनी केलं पक्षांतर

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दोन दिवसांचा कालावधी बाकी असतानाच पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर येत आहे. स्थानिक पक्ष नेतृत्व आणि आमदारांवर आरोप करत पक्षाच्या 12 माजी नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात सर्वाधिक आठ माजी नगरसेवक भोसरीतील आहेत. आणखी काही माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. पक्षांतरामुळे भाजपच्या अडचणींत भर पडली आहे. त्यामुळे या नाराजीचा भाजपला निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 15 वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 2017 मध्ये भाजपने उलथवून टाकली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांनी अजित पवारांची साथ सोडून कमळ हाती घेतले. महापालिकेवर प्रथमच कमळ फुलले. काहींना पदे दिली. तरी काहींना आश्वासन देऊनही दिली नाहीत त्यामुळे. नाराज माजी नगरसेवकांनी भाजपची साथ सोडण्यास सुरुवात केली आहे.

भाजपच्या आतापर्यंत 12 माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. त्यात चिंचवडमधील माया बारणे, अंबरनाथ कांबळे, तुषार कामठे, चंदा लोखंडे या चार जणांचा समावेश असून, भोसरीतील सर्वाधिक आठ नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामध्ये वसंत बोराटे, संजय नेवाळे, लक्ष्मण सस्ते, प्रियांका बारसे, भीमाबाई फुगे, सारिका लांडगे, रवी लांडगे, एकनाथ पवार अशा आठ जणांनी भाजपला रामराम ठोकला. त्यातील रवी लांडगे आणि पवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. उर्वरित माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

सक्षम असताना पदांपासून आमदारांनी डावलले, सातत्याने अन्याय केला, विकासकामे रोखली, आम्ही केलेल्या पाठपुराव्याने झालेल्या कामांचे श्रेय घेतले जाते. दादागिरी सहन करावी लागते, अशा तक्रारी करून या माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Raj Thackeray : ‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले Raj Thackeray : ‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
“आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी...
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
‘फायर नहीं, वाइल्ड फायर…’, पुष्पा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस
खड्ड्यात जा.. म्हणणाऱ्या अश्नीरची सलमानने घेतली शाळा; म्हणाला “स्वत: हिरो बनण्याचा..”
जिभेची चव बदलली? ‘हा’ आजार तर नाही ना !
तुम्हीही हे 6 पदार्थ खाता? सोडा बरं, नाही तर अकाली म्हातारे व्हाल!
Kashmera Shah Accident – कश्मीरा शाहचा भीषण अपघात, फोटो शेअर करत दिली माहिती