ईडीची धाड पडल्यानंतर आप मंत्र्यांचा राजीनामा, आज भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता
दिल्ली सरकारमधले आपचे मंत्री कैलाश गेहलोत यांच्यावर ईडीची धाड पडली होती. त्यानंतर गेहलोत यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर गेहलोत आज भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
आज तकने याबाबत याबाबत वृत्त दिले आहे. आज 12.30 वाजता गहलोत भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेऊ शकतात. गेहलोत यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले होते. दिल्ली सरकारचा बहुतांश वेळ हा केंद्र सरकारसोबत लढण्यात जातोय, त्यामुळे दिल्लीचा विकास होऊ शकत नाही असे गेहलोत यांनी पत्रात म्हटले होते. असे म्हणत गेहलोत यांनी पक्षातून राजीनामा दिला होता.
आम आदमी पक्ष सोडताना गेहलोत यांनी पक्षावर गंभीर आरोप केले होते. जनतेसाठी लढण्याऐवजी आपण फक्त राजकीय अजेड्यांसाठी आपण लढतोय ही बाब अतिशय वाईट आहे असे गेहलोत म्हणाले होते. यामुळे दिल्लीच्या नागरिकांसाठी पायाभुत सुविधा देणंही कठी झालं आहे. दिल्लीच्या जनतेची सेवा करण्यासाठी मी माझी राजकीय कारकीर्द सुरू केली होती. हा प्रवास मी सुरुच ठेवणार आहे, कारण पक्ष सोडण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता असेही गेहलोत म्हणाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List