‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा देणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ आली आहे, सचिन पायलट यांचा भाजपला टोला

‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा देणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ आली आहे,  सचिन पायलट यांचा भाजपला टोला

शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शेतमालाला हमीभाव या सामान्य लोकांशी संबंधित प्रश्नांवर बोलण्याऐवजी भाजपचे नेते धर्मांधता पसरवत आहेत. घटनात्मक पदावर बसलेले योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन सरकारच्या कामावर बोलण्याऐवजी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा देतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ‘वोट जिहाद’ आणि मताला धार्मिक युद्ध म्हणतात. हे त्यांच्या पदाला शोभा देणारे नाही. भाजपने नेहमीप्रमाणे पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, मंदिर-मशीद हाच प्रचार सुरू केला आहे. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपला सुनावले.

काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते टी. एस.सिंगदेव, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा महंमद आणि प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड उपस्थित होते.

सचिन पायलट म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. संबंध देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा देतो. त्यामुळे या निवडणुकीत सरकार बदलून महाराष्ट्र देशाला योग्य दिशा देईल. भाजपने महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक हरियाणा आणि जम्मू-कश्मीरच्या निवडणुकीबरोबर घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपला हिसका दिल्याने ते एकत्रित निवडणूक घेण्यास घाबरले असतील, अशी टीका पायलट यांनी केली. महायुतीच्या पंधराशे रुपयांत महिलांना मदत होणार नाही. 450 रुपयांचा घरगुती गॅस सिलिंडर हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. लोकांना फसवून आणि गद्दारी करून आलेले हे महायुती सरकार सत्तेतून घालवण्याची वेळ आली असल्याची टीका पायलट यांनी केली.

शिंदेंच्या नावाची घोषणा का नाही?

आम्ही सत्तेसाठी एकत्र आलेलो वाचविण्यासाठी आमची आघाडी आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र एकसूत्रता नाही. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. मग भाजप त्यांना परत मुख्यमंत्री करेल का, हे भाजपने घोषित करावे. त्यांच्याकडे अनेकजण  बाळगून आहेत, असा टोला त्यांनी लगावला. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे ठिकठिकाणी हेलिकॉप्टर चेकिंग होत असल्याच्या प्रश्नांवर बोलताना हेलिकॉप्टर चेक करण्यापेक्षा अॅम्ब्युलन्स, पोलीस वाहने तपासा. त्याचा वापर सरकार करू शकते, अशी टीका त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ ‘एक है तो सेफ हैं…’, नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा राहुल गांधी यांनी असा बनवला अर्थ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी आले आहेत. प्रचार सभेत ते महायुती आणि नरेंद्र मोदी यांच्यवर हल्ला करत...
वेश्यांचे वंशज.. प्रसिद्ध अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर तुरुंगात रवानगी
“पुष्पा कभी झुकेगा नहीं, पर पहली बार..”; तुंबड गर्दीसमोर अल्लू अर्जुन नतमस्तक
मुंबई, दिल्ली नव्हे थेट बिहारमध्ये ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर लाँच, अल्लू अर्जुनचं बिहार कनेक्शन काय?
नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, ‘संसार केला फक्त मुलांसाठी कारण…’
Pushpa 2: ‘पुष्पा 2’च्या ट्रेलर लाँचदरम्यान रेकॉर्डब्रेक गर्दी; पोलिसांकडून लाठीचार्ज अन्..
पुष्पा म्हणजे ब्रँड, ट्रेलर लाँचवेळी श्रीवल्लीचं वक्तव्य चर्चेत..