रत्नागिरीत अवैध मद्यासंबंधित 131 गुन्ह्यांची नोंद, 110 आरोपींना अटक; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
On
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याविरुध्द एकूण 131 गुन्हे नोंद केले असून 110 आरोपींना अटक केली आहे. हातभट्टीची गावठी दारु 3349 लिटर, देशी मद्य 66.42 बल्क लिटर, विदेशी मद्य 82.26 बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य 9795.97 बल्क लिटर, रसायन 41505 लिटर तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो व मारुती स्विफ्ट कार या दोन वाहनांसह एकूण रुपये 1 कोटी 30 लाख 83 हजार 95 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात 15 ऑक्टोबर रोजी पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील/बेकायदेशीर मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
जानेवारी, 2024 पासून अद्यापपर्यंत महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 93 नुसार एकूण 28 प्रकरणात रुपये 16 लाख एवढ्या रक्कमेची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे सतत अवैध दारुधंद्यात गुंतलेल्या आरोपीत इसमांकडून घेण्यात आली आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरुन प्रवाशी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत अचानकपणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्दची कारवाई या पुढेही सुरुच राहील.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
50 खोके एकदम ओके असे म्हणणारे महायुतीचे सरकार पायउतार होईल, मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास
18 Nov 2024 00:02:50
आम्हीं देखील खूप निवडणुका केल्या आहेत.राज्यस्तरावरील निवडणुकांसाठी कधी आम्ही गेलो नाही.पण महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येथे पंतप्रधान आले....
हवामान बदलल्याने होऊ शकतो सर्दी-खोकल्याचा त्रास, आरोग्याची काळजी घेण्यासाठी या घरगुती टिप्स करा फॉलो
Comment List