गडचिरोलीत निवडणूक प्रक्रियेसाठी लष्कराची पाच हेलिकॉप्टर

गडचिरोलीत निवडणूक प्रक्रियेसाठी लष्कराची पाच हेलिकॉप्टर

गडचिरोलीत निवडणूक प्रक्रियेसाठी वायुसेना आणि लष्कराची पाच एमआय-17 हेलिकॉप्टर आली आहेत. रविवार सकाळपासून अहेरी येथे वायुसेनेच्या एमआय-17 हेलिकॉप्टरद्वारे विधानसभा मतदारसंघाच्या 76 मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचाऱयांचे हेलीड्रॉपिंग येथून सुरू झाले. ईव्हीएम  आणि सर्व मतदान कर्मचारी पोलीस ठाण्यांवरील 14 बेस कॅम्पवर ड्रॉप केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

बेस कॅम्पवरून 19 नोव्हेंबर रोजी सुरक्षा रक्षकांच्या गराडय़ात कर्मचारी अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर जाणे-येणे अशी 30 ते 35 किमी पायपीट करतील. या वेळी सोमवारची रात्र जंगलातच काढावी लागेल. काही केंद्रांवर 10 ते 15 किमी पायपीट करावी लागेल. 19 तारखेपर्यंत गडचिरोलीमध्ये ईव्हीएम आणि मतदान कर्मचाऱयांचे हेलीड्रॉपिंग चालू राहील. गडचिरोली जिह्यात एकूण 972 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यांपैकी 458 मतदान केंद्रांवर बेस कॅम्पहून पायी जावे लागते, तर मतदान केंद्रांवर ईव्हीएमची ने-आण चॉपरने होणार आहे.

गडचिरोली जिल्हा जवळपास 76 टक्के जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थित लोक आश्रय घेतात. जिह्याची एकूण लोकसंख्या 10 लाख 72 हजार 942 असून जनगणनेनुसार पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे 5 लाख 41 हजार 328 व 5 लाख 31 हजार 614 याप्रमाणे आहे. जिह्यात अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या अनुक्रमे 1 लाख 20 हजार 745 व 4 लाख 15 हजार 306 एवढी आहे. जिह्याची एकूण साक्षरता 74.4 टक्के आहे. अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्येची टक्केवारी 11.25 टक्के व 38.7 टक्के अनुक्रमे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी मणिपूर ‘सेफ’ करा!; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल आधी मणिपूर ‘सेफ’ करा!; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. मणिपूर आणि आसामच्या सीमेवर असणाऱ्या जिरी नदीत एक महिला आणि दोन मुलांचा मृतदेह...
ईडीच्या धाडी पडताच दिल्लीतील आपच्या मंत्र्याचा राजीनामा; परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांचे केजरीवाल यांना पत्र
मोदींच्या राजवटीत फक्त अदानीच सेफ; प्रियंका गांधी यांचा जोरदार हल्ला
सगळ्यांचा नाद करायचा, पण माझा नाही! शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा
मुंबईवर अदानीची सुलतानी, बीकेसीत महाविकास आघाडीची दणदणीत; उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसह महाराष्ट्रद्रोह्यांना ठणकावले…
भाजपने राज्यात देशभरातून 90 हजार बूथ एजंट पेरले! पंकजा मुंडे यांनीच केली पोलखोल
मणिपूरमध्ये अराजक; मुख्यमंत्र्यांसह 10 भाजप आमदारांची घरे पेटवली; भाजप सरकार अडचणीत…