50 खोके एकदम ओके असे म्हणणारे महायुतीचे सरकार पायउतार होईल, मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास

50 खोके एकदम ओके असे म्हणणारे महायुतीचे सरकार पायउतार होईल, मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास

आम्हीं देखील खूप निवडणुका केल्या आहेत.राज्यस्तरावरील निवडणुकांसाठी कधी आम्ही गेलो नाही.पण महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येथे पंतप्रधान आले. केंद्रीय गृहमंत्री आले. ही महाराष्ट्र राज्यातील निवडणुक आहे. येथील जनता या ठिकाणचा निर्णय घेईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी प्रथम देशातील जनतेसाठी काम करावे. जनतेने त्यासाठीच त्यांना पंतप्रधान बनवले असल्याचे खडेबोल आज काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुनावले.सांगली येथील सभा आटोपून कोल्हापूर विमानतळावरुन निघताना वाटेत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशावर प्रेम नाही. जनतेच्या समस्या सोडवण्याचा त्यांच्याकडे काही उपाय नाही.जनतेने देशाचे काहीतरी भले करण्यासाठी तुम्हाला निवडले आहे.पण सत्ता वाचवण्यासाठी ते आता तालुका पातळीवर देखील जात असून, लोकसभेत त्यांना कमी जागा मिळाल्याने त्यांची खुर्चीही सुरक्षित नाही.त्यामुळे केंद्रातील सरकार स्थिर नसल्याचा दावाही यावेळी खर्गे यांनी केला.यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील,आमदार जयंत आसगावकर,कर्नाटकचे आमदार हसन मौलाना,माजी आमदार अंजली निंबाळकर,कोल्हापूर उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखविंदर ब्रार,तोफिक मुल्लानी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रचारावरून मोदी,शहा आणि योगींनाही सुनावले

झाशीच्या सरकारी रुग्णालयात लहान मुले मृत्यूमुखी पडत असताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी इकडे निवडणूकीचा प्रचार करत फिरत आहेत. तर दुसरीकडे मणीपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार आणि अत्याचाराच्या घटना घडत असतानाही तिकडे जाण्याऐवजी देशाचे गृहमंत्री सुद्धा इकडे प्रचारासाठी फिरत आहेत.त्यात सत्ता वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी हे तालुका पातळीवर देखील निवडणुकीसाठी जाताना दिसत आहेत.येथील निवडणूक प्रचार दौरा करून,ते विदेशात गेल्याचे निदर्शनास आणून देताना, मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच सुनावले.तसेच लोकांना धमकवले जात आहे.दबाव आणला जात आहे. ईडी,सीबीआयची भिती दाखऊन, पक्ष फोडले गेल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पन्नास खोके एकदम ओके… वाले महायुतीचे सरकार सत्तेतून पाय उतार होईल

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र,मुंबई या ठिकाणी गेलो आहे.या ठिकाणी जनतेचा महाविकास आघाडीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके म्हणणारे महायुतीचे सरकार आता सत्तेतून पाय उतार होईल.यात कसलीही शंका उरली नाही.या सुसंस्कृत महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगले सरकार आम्ही देऊ असा ठाम विश्वास खरगे यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपला हरवुन,एक चांगले जनतेच्या विश्वासाचे नवीन सरकार आणण्यासाठीच आम्ही एक झालो आहोत.त्यामुळे कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगताना,प्रचारासाठी थोडाच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही.सर्व मिळून आम्ही मुख्यमंत्री ठरवू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान निवडुन आल्यानंतर पच्चास खोके प्रमाणे कसलाही गैरप्रकार होणार नाही.ज्यांना आम्ही संधी दिली आहे ते कुठेही जाणार नाहीत.खोके सब ओके भी नही है. असा टोलाही त्यांनी लगावला..

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

50 खोके एकदम ओके असे म्हणणारे महायुतीचे सरकार पायउतार होईल, मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास 50 खोके एकदम ओके असे म्हणणारे महायुतीचे सरकार पायउतार होईल, मल्लिकार्जुन खरगे यांचा विश्वास
आम्हीं देखील खूप निवडणुका केल्या आहेत.राज्यस्तरावरील निवडणुकांसाठी कधी आम्ही गेलो नाही.पण महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येथे पंतप्रधान आले....
हवामान बदलल्याने होऊ शकतो सर्दी-खोकल्याचा त्रास, आरोग्याची काळजी घेण्यासाठी या घरगुती टिप्स करा फॉलो
महाविकास आघाडीच्या भक्कम साथीने विजयाची पताका घेऊन विधानसभेत जाणार – संजय कदम
मणिपूरातील भाजपच्या बिरेन सिंग सरकारला धक्का; NPP ने पाठिंबा काढला
Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप
Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान
‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?