पेणमध्ये परिवर्तन घडणार, शिवसेना जिंकणार; कोलाड नाक्यावर महाविकास आघाडीची सभा

पेणमध्ये परिवर्तन घडणार, शिवसेना जिंकणार; कोलाड नाक्यावर महाविकास आघाडीची सभा

भाजपच्या निष्क्रिय आमदारांमुळे पेण विधानसभा मतदारसंघाचा विकास थांबला आहे. त्यामुळे यावेळी मतदारांनीच परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून कोणत्याही परिस्थितीत शिवसेनाच जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद भोईर यांच्या प्रचारासाठी कोलाड नाक्यावर भव्य सभा झाली. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अनंत गीते यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली. गद्दारी करून आलेले सरकार आता आपटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्या निष्क्रिय कारभारामुळे प्रचंड नाराजी आहे. रस्ते, पाणी, आरोग्याच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे प्रसाद भोईर यांचा शंभर टक्के विजय होईल, असेही ते म्हणाले. व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, तालुकाप्रमुख समीर शेडगे, उल्का महाजन, उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के, सोपान सुतार, काँग्रेसच्या नंदा म्हात्रे, दर्शना जवके, चंद्रकांत लोखंडे, चेतना लोखंडे, महादेव जाधव, कुलदीप सुतार, विष्णू लोखंडे, संतोष खेरटकर, असिफ पठाण, सुनील महाडिक, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर खामकर, संतोष पडवळ, संदीप माने, रवींद्र सानप, शैलेश सानप, वैभव जैतपाल, शहबाज हाफिज, आझम हाफिज, उत्तम दहिंबेकर, चंद्रकांत कापसे आदी उपस्थित होते.

विविध संघटनांचा पाठिंबा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार प्रसाद भोईर यांना सर्वहारा जनआंदोलन समिती आणि भारत जोडो अभियानने पाठिंबा दिला. या सभेत तालुकाप्रमुख समीर शेडगे, कुलदीप सुतार, उल्का महाजन, नंदा म्हात्रे यांचीही भाषणे झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवींसाचा मोठा गौप्यस्फोट 2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवींसाचा मोठा गौप्यस्फोट
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राष्ट्रपती राजवट नेमकी कुणाच्या सांगण्यावरून लागली? याबाबत प्रचंड चर्चा होत...
‘धर्मयुद्ध’ शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘महाभारत’; ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं आव्हान
“माझा जीव घे पण तिला वाचव..”; पत्नीच्या कॅन्सरबद्दल बोलताना नवज्योत सिंग सिद्धू भावूक
वाणी कपूरचा अपघात, अभिनेत्रीच्या गाडीची पोलिसांच्या गाडीला धडक, कशी आहे प्रकृती?
रवी दुबेची पत्नी सरगुनचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? अखेर त्याने सोडलं मौन
सतत तोंड येतं? मग तातडीने करा ‘हे’ घरगुती उपाय 
महाराष्ट्र काँग्रेसची ‘भ्रष्टयुती’ विरोधात कॉमिक-शैलीतील जाहिरात मोहीम