ईडीच्या धाडी पडताच दिल्लीतील आपच्या मंत्र्याचा राजीनामा; परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांचे केजरीवाल यांना पत्र

ईडीच्या धाडी पडताच दिल्लीतील आपच्या मंत्र्याचा राजीनामा; परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांचे केजरीवाल यांना पत्र

ईडीच्या धाडी पडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड धसका घेतलेल्या दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी त्यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून राजीनामा जाहीर केला. आम आदमी पार्टीचा बराच वेळ केंद्र सरकारशी लढण्यात गेला. पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप करत गेहलोत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

हे भाजपचे घाणेरडे षडयंत्र असून दिल्लीत होणाऱया विधानसभा ईडी आणि सीबीआयच्या जोरावर भाजपला जिंकायची आहे, असा आरोप करत दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी गेहलोत यांचा राजीनामा स्वीकारला. गेहलोत यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरलेला नसून भाजप घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. गेहलोत यांच्या घरांवर, ठिकाणांवर ईडी तसेच आयटीने अनेकदा धाडी टाकल्या. ते पाच वर्षे दिल्ली सरकारचा भाग होते. भाजपने त्यांच्याविरोधात सातत्याने षडयंत्र रचले आणि त्यांच्यापुढे भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय ठेवला नाही, असा आरोप आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे. दिल्ली निवडणुकीपूर्वी मोदी वॉशिंग मशीन सक्रिय झाले आहे. आता या मशीनच्या माध्यमातून अनेक नेत्यांचा भाजपमध्ये समावेश होणार आहे, असा टोलाही संजय सिंह यांनी लगावला आहे.

कैलाश गेहलोत यांनी 2015 मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला. 2017 मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. पेशाने वकील असलेल्या गेहलोत यांनी राजकारणात येण्यापूर्वी दहा वर्षे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात अनेक मोठे खटले लढवले.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सगळ्यांचा नाद करायचा, पण माझा नाही! शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा सगळ्यांचा नाद करायचा, पण माझा नाही! शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा
राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार टेंभुर्णी येथील सभेत पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘एकदा रस्ता चुकला की, त्याला जागा दाखवलीच...
मुंबईवर अदानीची सुलतानी, बीकेसीत महाविकास आघाडीची दणदणीत; उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसह महाराष्ट्रद्रोह्यांना ठणकावले…
भाजपने राज्यात देशभरातून 90 हजार बूथ एजंट पेरले! पंकजा मुंडे यांनीच केली पोलखोल
मणिपूरमध्ये अराजक; मुख्यमंत्र्यांसह 10 भाजप आमदारांची घरे पेटवली; भाजप सरकार अडचणीत…
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार शेवटच्या रविवारी सर्वत्र प्रचारसभा, रॅलींचा ‘संडे धमाका’
गडचिरोलीत निवडणूक प्रक्रियेसाठी लष्कराची पाच हेलिकॉप्टर
शिवतीर्थावर निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम; हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यस्मरण