देशाची आर्थिक राजधानी गुजरातला घेऊन जाण्याचे भाजपाचे षडयंत्र: रागिनी नायक

देशाची आर्थिक राजधानी गुजरातला घेऊन जाण्याचे भाजपाचे षडयंत्र: रागिनी नायक

नागपुरमध्ये होणाऱ्या टाटा एअरबस प्रकल्पाचे गुजरातच्या बडोद्यात उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मोदी सरकारने हिरे उद्योग, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रासह, वेदांता फॉक्सकॉन सारखे 17 मोठे प्रकल्प गुजरातला पळवले. राजकीय लाभासाठी भाजपा महाराष्ट्रातील उद्योग, वित्तीय संस्था गुजरातला पळवून महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे. या भेदभावामागे एक मोठे षडयंत्र असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून गुजरातकडे घेऊन जाण्याचा डाव आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागिनी नायक यांनी केला आहे.

टिळक भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रागिनी नायक म्हणाल्या की. महाराष्ट्रातील भाजपा सरकारने मागील 10 वर्षात 5 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. 2014 मध्ये महाराष्ट्रावर 2.9 लाख कोटींचे कर्ज होते ते वाढून आता 7.82 लाख कोटी झाले आहे. कर्जाचा डोंगर वाढवून भाजपा सरकारने स्वतःचे खिसे भरले व सरकाराची तिजोरी रिकामी केली आहे. भाजपा सरकारच्या भ्रष्टाचाराचे एक एक कारनामे पुढे आले आहेत. नागपूर व संभाजीनगरच्या इमारत बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा एक सेट भेट देण्याचा निर्णय झाला. यासाठी 27 ऑक्टोबर 2020 ला एक बैठक घेऊन टेंडर मागवण्यात आले. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने 2021 साली याला मंजूरी दिली. स्टेनलेस स्टीलचे पाच लाख सेट वाटण्याचे निश्चित केले आणि पण हे काम स्टेनलेस स्टिल कंपनीला दिले नाही, तर कापड उद्योगातील अग्रेसर मफतलाल कंपनीला देण्यात आले. 30 भांड्यांच्या एका सेटची किंमत 8820 निश्चित केली गेली, म्हणजे 441 कोटींचे हे टेंडर निघाले. हाच दर बाजारात 5250 रुपये होता आणि मोठ्या प्रमाणात खरेदी असल्याने त्याचा भाव कमी करून तो 4500 रुपयांना मिळू शकला असता पण त्याकडे दुर्लक्ष करून तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपयांची लूट केली गेली. ही भांडी लाभार्थ्यांपर्यंत पोहचली की नाही हेही स्पष्ट झालेले नाही. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील भाजपा सरकारने जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून खिसे भरण्याचे काम केले आहे, असे रागिनी नायक यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, चरणसिंह सप्रा, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवऱ्याने माझ्यावर वेश्याव्यवसाय…, ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य नवऱ्याने माझ्यावर वेश्याव्यवसाय…, ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
Bade Achhe Lagte Hain fame Actress: ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिकेतील अभिनेते राम कपूर आणि...
पाटण्यात पुष्पा-2 च्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी गर्दी अनियंत्रित, पोलिसांनी केला लाठीचार्ज; व्हिडिओ आला समोर
महाराष्ट्रातील त्रिकुट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही; सुप्रिया सुळे यांचा महायुतीवर निशाणा
शिंदे पिता-पुत्राचा असा पराभव करा की, भविष्यात गद्दारी करण्याचे कोणी धाडस करणार नाही; शरद पवार यांचा घणाघात
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या लोकसेवेच्या पंचसूत्रीद्वारे जनसामान्यांना न्याय मिळेल : नाना पटोले
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही; शरद पवारांचा सरकारवर निशाणा
देशाची आर्थिक राजधानी गुजरातला घेऊन जाण्याचे भाजपाचे षडयंत्र: रागिनी नायक