गद्दार भुमरेंनी पैठणकरांना पंचवीस वर्षांचा हिशोब द्यावा – अंबादास दानवे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्लीप बॉय ते मंत्री केलेल्या संदिपान भुमरे नावाच्या बोक्याने खोक्यांच्या नादी लागून शिवसेनेशी गद्दारी केली. शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करत पाच वेळा आमदार केलेल्या भुमरे यांनी पैठणकरांना हिशेब द्यावा, असे प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी बिडकीन येथे शिवसेना उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले.
बिडकीन परिसरात होऊ घातलेल्या डि.एम.आय.सी. प्रकल्पासह जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना मंत्री भुमरे काय करत होते आसा प्रश्न देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. उमेदवार दत्ता गोर्डे यांनी भुमरेंकडून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तालुक्याचा विकास न करता स्वतःला भुमरे सरकार म्हणून घेणाऱ्या भुमरेंना जनतेचे सरकार आणण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहन केले.
पालकमंत्री असतानासुद्धा रोजगार निर्मिती साठी भुमरेच काहीच योगदान दिले नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भुमरे यांना आम्ही शिवसैनिकांनी पाणी पाजले असल्याचे तालुकाप्रमुख मनोज पेरे म्हणाले. माजी मंत्री अनिल पटेल यांनी खऱ्याअर्थाने बिडकीनसह पैठण तालुक्यात शिवसेना उभी करणाऱ्या अनेक शिवसैनिकांना देशोधडीला लावण्याचे काम आमदार आणि मंत्री म्हणून निष्क्रिय आसलेल्या संदिपान भुमरे यांनी केले असा आरोप केला. भुमरे यांनी पंचवीस वर्षांत तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे वाटोळे करत भावाचा, मुलांचा आणि परिवाराचा विकास केला, असा आरोप माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केला.
यावेळी माजी तालुकाप्रमुख डॉ. सुनील शिंदे, काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद तांबे, जि.प.सदस्य विजय चव्हाण, तालुका युवा अधिकारी विकास गोर्डे, तमीज्जोद्दीन इनामदार आदींनी मार्गदर्शन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List