दिल्लीत प्रदूषण आणखी वाढले
दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सग पाचव्या दिवशीही गंभीर श्रेणीत नोंदवली गेली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदणी केल्यानुसार आज सकाळी 7 वाजता दिल्लीतील 14 ठिकाणी एक्यूआय 400 हून अधिक नोंदवला गेला. दिल्लीतील 37 टक्के प्रदूषण दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये शेतातील पराली जाळण्यामुळे होत असून 12 टक्के प्रदूषण वाहनांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण वाढल्यामुळे हरयाणा सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाइन वर्ग चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List