भाजपने राज्यात देशभरातून 90 हजार बूथ एजंट पेरले! पंकजा मुंडे यांनीच केली पोलखोल
महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला आंदण देणाऱ्या भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही गुजरातच्या कार्यकर्त्यांची फौज उतरवल्याचे उघड झाले आहे. भाजपने इतर राज्यांतून तब्बल 90 हजार बूथ एजंट आयात केले असून त्यात बहुसंख्य कार्यकर्ते गुजरातमधले आहेत. दुसरंतिसरं कुणी नाही तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीच पक्षाचे हे कारस्थान समोर आणले आहे.
महाराष्ट्रात भाजप व्हेंटिलेटरवर
पंकजा यांचा व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेने एक्स माध्यमातून भाजपला टोला हाणला आहे. महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे. ऑक्सिजन कमी झाला आहे. भाजप व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळेच गुजरातवरून भाजपला 90 हजार माणसे आणावी लागलीत, असा हल्ला शिवसेनेने
चढवला.
पंकजा म्हणाल्या, भाजपचं काम गडबडच!
राज्यभरात साधारण 90 हजार बूथ आहेत. या बूथसाठी भाजपने देशभरातून लोक आणलेत. बघितलं… साधं नाही… भाजप काम गडबडच आहे, असे पंकजा म्हणाल्या. हे कासवालजी गुजरातमधून आले. त्यांच्यासारखे 90 हजार लोक येथे आल्याने महाराष्ट्रातला ऑक्सिजन थोडा कमी झाला आहे, अशी टोलेबाजीही पंकजा यांनी पाथर्डीतील सभेत केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List