शास्त्र असतं ते! खेळाडू नेहमी च्युइंगम का चघळतात? फॅशन नसून आहे खास कारण
बहुतांश खेळामध्ये खेळाडू मैदानात च्युइंग गम चघळताना दिसतात. काही खेळाडू नको त्या वेळी च्युइंग गम चघळताना दिसल्याने ट्रोल देखील झाले आहेत. च्युइंगम खाणे ही काय फॅशन नसून त्यामागे खास कारण आहे. शास्त्रीय कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.
च्युइंगम चघळत बसल्याने मन एकाग्र होतं. मेंदुला चालना मिळते. मेंदुला चालना मिळाल्याने बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रीत होतं. तसेच फिजिकल अॅक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे बॉडीमध्ये रक्तप्रवाह वेगाने होतो. हृदयाची धडधडही वाढते. त्यामुळे च्युइंग गम चघळल्याने मेंदुला पर्याप्त रक्तपुरवठा होतो.
च्युइंगम वजन कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे भूक शमते आणि कॅलरीज कमी करण्यास मदत होते. च्युइंगम खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते. च्युइंगम दिवसभरात 11 कॅलरी प्रति तास कमी करण्याची क्षमता ठेवते. त्याचबरोबर तोंडात मोठ्या प्रमाणात लाळ तयार होत असल्याने पचनशक्तीही चांगली राहते. तसेच त्यामुळे मैदानवर खेळत असताना खेळाडूंना तहानही कमी लागते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List