IVF तंत्रज्ञानानं जन्मलेल्या मुलांना हृदयासंबंधित आजारांचा जास्त धोका, पहा रिपोर्ट काय सांगतो?

IVF तंत्रज्ञानानं जन्मलेल्या मुलांना हृदयासंबंधित आजारांचा जास्त धोका, पहा रिपोर्ट काय सांगतो?

आजच्या धकाधकीचे जीवन अनहेल्दी फूड आणि अनहेल्दी लाईफस्टाईल आणि उशिरा केलेले लग्न त्यासोबतच उशिरा मुलं जन्माला घालण्याचा प्लॅन यामुळे वंधत्वाच्या समस्येत लक्षणीय वाढ झालीये. आज सहा पैकी एका दाम्पत्याला वंधत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागत हेच कारण आहे की लोक मुलं जन्माला घालण्यासाठी आय वी एफचा पर्याय निवडत आहे. सामान्य भाषेत याला आपण टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतो.

सध्याच्या काळात लोकांमध्ये आयवीएफ एक सामान्य गोष्ट बनली आहे. आधी करिअर त्याच्यानंतर लग्न उशिरा करणं त्यासोबतच मूल जन्माला उशिरा घालण्याचे प्लॅनिंग आणि त्यासोबतच अनेक शारीरिक समस्या या सगळ्या गोष्टींमुळे लोकं आय वी एफ ला पसंती देत आहे. पण आत्ता काही दिवसांपूर्वी एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की आयवीएफने जन्मलेल्या मुलांना हृदयाशी संबंधित आजारांचा जास्त धोका असतो.

काय आहे आय वी एफ

आयवीएफ म्हणजे इन विट्रो फर्टीलायझेशन हे असिस्ट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या अधिक व्यापकपणे ज्ञात प्रकारांपैकी एक आहे आय वी एफ शुक्राणूंना अंड्याचे फलित होण्यास मदत करण्यासाठी औषधे आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेचे संयोजन वापरून कार्य करते आणि गर्भाशयात फलित अंड्याचे रोपण करण्यास मदत करते.

काय सांगतो अभ्यास

या अभ्यासात असे लक्षात आले आहे की आय वी एफ ने जन्मलेल्या मुलांमध्ये नैसर्गिक पद्धतीने जन्मलेल्या मुलांपेक्षा हृदयास संबंधित आजार होण्याचा धोका 36% जास्त असतो. या अभ्यासात तीन दशकांमध्ये चार पेक्षा जास्त देशात ज्यामध्ये डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे आणि स्वीडनच्या 7.7 मिलियन पेक्षा जास्त लोकांचा डेटा समाविष्ट आहे या अभ्यासानुसार जन्मलेल्या मुलांना गर्भात किंवा जन्माला आल्यानंतर एका वर्षात गंभीर हृदयासंबंधी आजार झाल्याचे दिसून आले. त्या तुलनेत नैसर्गिक पद्धतीने जन्मलेल्या मुलांमध्ये हा धोका कमी प्रमाणात दिसून आलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वडेट्टीवारांनी मतदारांना शिवीगाळ केली आता जनताच…; वादग्रस्त व्हीडिओवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल वडेट्टीवारांनी मतदारांना शिवीगाळ केली आता जनताच…; वादग्रस्त व्हीडिओवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. ठिकठिकाणी नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. नेत्यांनी जाहीर सभांमध्ये केलेली विधानं गाजत आहेत. असं...
कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढत, मुंबईचा किंग कोण ठरणार? दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे; छत्रपतींच्या स्मारकावरून संजय राऊतांनी भाजपला घेरलं
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर सलमान खानच्या एक्सगर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, ‘त्याला मारून टाकलंय आणि…’
दिव्या भारतीला उडी मारताना पाहिलं…, 21 वर्षांनंतर अभिनेत्रीच्या मृत्यूचा खुलासा, धक्कादायक आहे सत्य
अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान निम्रत कौरने जाहीर केलं तिचं रिलेशनशिप स्टेटस
मुकेश खन्ना स्पर्शही करू द्यायचे नाही.. ; ‘शक्तीमान’च्या गीताने सांगितला अनुभव