भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे: जयंत पाटील
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लबोल केला. आज करमाळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते असं म्हणाले आहेत.
ते म्हणाले आहेत की, ”अनेक गावात आजही पाण्याची समस्या भेडसावत आहे. मी जलसंपदा मंत्री असताना मांगीच्या तलावात अतिरिक्त 7 ते 8 टीएमसी पाणी उपलब्ध करून दोन आवर्तनं केली. मात्र बदललेल्या सरकारने आवश्यक ती काळजी घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कुर्डू, पिंपळकुटे आणि परिसरातील गावांना बेंद ओढ्याचे पाणी सोडण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो.”
‘एक्स’वर पोस्ट करत ते म्हणाले की, ”योगी आदित्यनाथ येऊन सांगतात “बटेंगे तो कटेंगे”. हिंदू समाजाला भीती दाखवायची. केंद्रात, राज्यात तुमचेच सरकार. तर हिंदू धोक्यात कसे? यांच्यातील एक आमदार राज्यभर टोकाची भाषणं करून तेढ निर्माण करत होता. मात्र त्यास बळी न पडता आपला महाराष्ट्र एकसंघ राहिला. बटेंगे तो कटेंगे हा विषयच नाही. क्या खायेंगे? क्या कमाएंगे? हा विषय आहे.”
जयंत पाटील पुढे म्हणाले की, ”एकनाथ शिंदे, अजित पवार यांना भाजप वापरून घेत आहे. निवडणुकीनंतर यांना कधी निरोप मिळेल सांगता येत नाही. यांच्यात एकसंघपणा नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.”
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ लोकांशी संवाद साधला.
अनेक गावात आजही पाण्याची समस्या भेडसावत आहे. मी जलसंपदा मंत्री असताना मांगीच्या तलावात अतिरिक्त ७ ते ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून दोन… pic.twitter.com/J86GFeT5cl
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 8, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List