भाजप ही महाबोगस पार्टी आहे, या निवडणूकीत त्यांचा पाडाव होणारच – महादेव जानकर

भाजप ही महाबोगस पार्टी आहे, या निवडणूकीत त्यांचा पाडाव होणारच – महादेव जानकर

भाजप ही महाबोगस पार्टी आहे. भाजपला पर्याय दिल्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, तरुण आदी उपेक्षित वर्गाला चांगले दिवस येणार नाहीत, अशा शब्दात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील रासपचे उमेदवार पंकज देवकते यांच्या प्रचाराचा शुभारंभ रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे हस्ते करण्यात आला. श्री विठ्ठलाचे दर्शन घेवून त्यांनी संत नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपने सत्तेच्या जोरावर पक्ष फोडले, घरं फोडली, काका पुतण्यात फूट पाडली. हे सगळं कटकारस्थान कोणी केलं हे सर्व जनतेला माहीत आहे. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष आणि चिन्ह देखील पळविले. या सगळ्या राजकीय षडयंत्रामागचा किंगमेकर कोण आहे, हे लोकांना माहीत असल्याने, लोकांचा भाजपवर राग आहे आणि तो राग या विधानसभा निवडणुकीतून व्यक्त होईल अन् भाजपचा पाडाव झालेला आपल्याला दिसून येईल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली ‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली
मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे गाढवाचा मेळा भरवला जातो. चित्रकूट जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गाढवाचा सुरु होतो, जो पुढील काही...
शास्त्र असतं ते! खेळाडू नेहमी च्युइंगम का चघळतात? फॅशन नसून आहे खास कारण
हे अख्खं सरकार कचराकुंडीत टाकण्यासारखं आहे, द्या कचराकुंडीत टाकून; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे: जयंत पाटील
Justice Chandrachud Retires: सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड निवृत्त, शेवटच्या दिवशी झाले भावुक; म्हणाले….
Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य
अजितदादामध्ये बदल का झाला…अजित पवार यांनी सांगितले ते कारण