Ambadas Danve: शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल, अंबादास दानवे यांचा निवडणूक आयोगाला इशारा
”निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे पालन करून प्रचार सुरू आहे. असे असताना छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्ष आणि विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून पोलिसांकडून भयाचे वातावरण तयार केले जात आहे”, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यानंत त्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रही लिहिलं आहे.
आपल्या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे की, ”निवडणूक आयोगाला भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडावी, असे वाटत नसेल तर त्यांना इथे व्यापक जनांदोलनाला सामोरे जावे लागेल. सदर अशयाचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील मी लिहिले आहे.”
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात अंबादास दानवे काय म्हणाले?
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात अंबादास दानवे म्हणाले आहेत की, ”राज्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा काळ सुरु असून उक्त काळात सर्व राजकीय पक्ष आचारसंहितेच्या नियमांचे पालन करुन आपल्या पक्षांचा प्रचार करीत आहेत. तथापि, छत्रपती संभाजीनगर पश्चिम (विधानसभा क्र.१०८) मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येऊन काही पोलिस अधिकारी व कर्मचारी हे विरोधी पक्षाच्या, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्यायकारक व दबाव टाकणाऱ्या कारवाया करत आहेत. अशा कार्यपद्धतीमुळे मतदारसंघात भयाचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सदरहू बाब निकोप लोकशाही व्यवस्थेस धोका निर्माण करणारी आहे. आचार संहितेच्या काळात पोलिस यंत्रणेचा सत्ताधारी पक्षाच्या दडपशाहीसाठी वापर होणे हे अत्यंत गंभीर आहे. निवडणूक आचारसंहितेच्या नियमांनुसार, निवडणूक प्रक्रियेतील सर्व पक्षांना समसमान संधी देण्याचे बंधन आहे, आणि कोणत्याही अधिकृत यंत्रणेचा राजकीय हेतूने पक्षपाती वापर होणे ही बाब अनुचित व कायद्याची उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे स्वच्छ व पारदर्शक निवडणूका होण्याच्या दृष्टीने उक्त प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचो आवश्यकता आहे.”
पत्रता त्यांनी पुढे लिहिलं आहे की, ”या प्रकरणी तात्काळ चौकशी करुन विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेच्या स्वातंत्र्य व पारदर्शकतेचा आदर राखण्यासाठी तात्काळ योग्य तो निर्णय घेवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने व्यापक जनआंदोलन करण्यात येईल.”
निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे पालन करून प्रचार सुरू असताना छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्ष आणि विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून पोलिसांकडून भयाचे वातावरण तयार केले जात आहे. निवडणूक आयोगाला भयमुक्त… pic.twitter.com/v7lgOXd4uQ
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 8, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List